आरोग्य विशेष-औसा तालूका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर शेख,सर्व डॉक्टर्स व टिमने केलेल्या प्रयत्नाला यश....अनुभवला थरार..सर्वानी वेळेवर प्रतिसाद दिला, प्रयत्न केले आणि त्या 4 कोरोना पॉजिटिव रुगनांचा जीव वाचला...
औसा मज़हरोद्दीन पटेल प्रतिनिधी
रात्री 1 वाजुन 5 मिनिटाला CCC औसा येथे Night duty वर असलेले CHO डॉ सुनील रावते यांचा दबक्या आवाजात कॉल आला..सर 4 Pts 02 वर आहेत आणि सर्वांचे SPO2 ऑक्सीजन काढल्यावर 60 ते 70 च्या दरम्यान Record होत आहेत आणि 1 तासात सर्व लहान 02 Cylinders रिकामे होतील..Jumbo Cylinder लागेल..RH औसा आणि DCHC लातुर येथे बेड रिकामे नाहीत..सर्व 4 रुगणांच्या जीवाला धोका होऊ शकतो..मन्न सुन्न झाले..2 मिनिट काय करावे सूचले नाही.. मग सुरु झाले युद्ध पातळीवर प्रयत्न 02 Cylinder साठी...पहीला कॉल डॉ सानपला..लवकर CCC औसा येथे पोहोच आणि डॉ रावतेला मद्त कर..हो सर निघतो लगेच.. दूसरा call डॉ रणदिवे सर ना.. 1 Jumbo 02 Cylinder CCC ला मिळेल का?हो सर लगेच पाठवतो..तो पर्यन्त डॉ रावते स्वता गाड़ी घेऊन RH औसा येथे bed मिळते का बघन्यासाठी आणि cylinder घेऊन येण्यासाठी...तीसरा कॉल डॉ सनातनला CCC Lamjana येथून phc Lamjana च्या ambulance मधे 2 ते 3 02 cylinders औसा ccc ला पाठवून दे..हो सर.. चौथा कॉल डॉ चेतनला 2 cylinders औसा CCC ला पाठवून दे..हो सर पण Ambulance खराब आहे.. बघतो काही तरी करतो सर.. पाचवा Call Phc Matola येथील HA जाधवला.. 1 Oxygen cylinder तुमच्या phc चा आनी 2 बेलकुंड phc चे औसा ccc येथे घेवून येण्यासाठी Driver ला सांग.. हो सर लगेच सांगतो..सहावा कॉल Bhada PHC MPW काम्बले ला.. नेहमीच्या style मधे निवांत.. हां बोला सर एवढ्या रात्री फ़ोन केलो.. ते सोड तू आणि लवकर 2 02 cylinders घेऊन ccc औसा येथे येण्यासाठी driver ला सांग...हो सर..सर्वांकडुन fast action झाली आणि सर्वांचे कॉल आले... सर आपण संगीतल्या नुसार 02 Cylinders CCC औसा येथे पाठविले आहेत.. CCC औसा येथून 1:50 वाजता अरबाज चा कॉल.. सर 1 Jumbo आणि 9 छोटे 02 Cylinders ccc औसा येथे पोहोचले आहेत आणि आता चिंता मीटली आहे..जीव भांडयात पडला..
परत पहाटे 5:30 ला phc hasegaon येथील गिरी महाराजना कॉल केला.. महाराज 2 02 cylinders औसा ccc ला पाठवा.. 10 मिनीटात महाराज चा कॉल..सर Cylinders औसा ccc ला पाठविले..पहाटे 5:45 ला डॉ अनिल चा call.. रहीम सर्व patients stable आहेत 1 pt थोड़ा toxic आहे..निवांत रहा..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.