आरोग्य मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
माजलगावमध्ये जमियत उलेमा हिंद कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी
-: बीड दि. १७ (प्रतिनिधी):
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेयांनीसरळ फोन करुन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्यानंतर सर्व हालचाली झाल्या. जमियत उलेमा हिंद, पटेल कोविड सेंटर या नावाने माजलगाव येथील शतायुषी रुग्णालयात कोविडसेंटर चालू करण्यासाठी मान्यता देण्याची प्रक्रियासुरूझाली आहे. लवकरच हे कोविडसेंटर सुरु केले जाईल. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयानेच खोडा घातल्याचे दिसून आले.
माजलगाव शहरातील डॉ. प्रसाद बिवरे यांच्या शतायुषी रुग्णालयामध्ये जमियत उलेमा हिंद, पटेल कोविड सेंटर या नावाने कोविड सेंटर चालू करण्याची मागणी संघटनेने केली होती. सर्व कायदेशीर कागदपत्रांची जुळवाजुळव करुन मागणी केली. नगर पालिकेनेही नाहर कत दिले परंतु जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात गरज नसतांना माजलगाव रुग्णालयाचे डॉ. साबळे यांचे नाहरकत
प्रमाणपत्र घेण्याचे सांगितले. खरं तर साबळेंची परवानगी घेण्याची गरज नाही परंतु जिल्हा रुग्णालयातील काही अधिकाऱ्यांना हे सेंटर द्यायचे नव्हते अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी साबळेच्या परवानगीचे कारण पुढे केले. शेवटी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क केला.व त्यास संमती मिळाली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.