मध्ययुगात रोमन लोक आपल्या नववर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून करत असत. यावेळी येणारे वर्ष सुखा समाधानाचे आणि आनंदाचे जावो म्हणून एकमेकांना एक एप्रिल दिवशी मूर्ख बनवत असत.
भारतातसुद्धा या दिवशी एकमेकांना मूर्ख बनवले जाते.
पण निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र आलेले लोक यादिवशी एप्रिल फुल नाही तर एप्रिल कुल व्हावा म्हणून वृक्षारोपन करत आहेत. घराजवळ एक झाड असले की आजूबाजूचे तापमान 2 डिग्री ने कमी होते.
गेल्या काही वर्षांपासून बेसुमार वृक्षतोड आणि हवेचे वाढत चालले प्रदूषण यामुळे पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात हानी होत आहे. एसी आणि फ्रीझचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे यामधून उत्सर्जित होणारा CFC वायू ओझोनच्या थराला धक्का पोहचवत आहे. हे जर असंच चालत राहिलं तर सूर्यापासून येणारी अतिनील किरणांमुळे पृथ्वीचे तापमान अधिक वाढवल्याशिवाय राहणार नाहीत.
याला पर्याय एकच आहे ते म्हणजे पर्यावरण वाचवणे. आणि पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ते वृक्षारोपण.
हे धेय्य समोर ठेवून ग्रीन लातूर वृक्ष टीमने आज १ एप्रिल ला एप्रिल फुल न करता १ झाड लावून "एप्रिल महिना कुल" करा असे आवाहन समाजमाध्यमांवर करत १४ झाडे लावली व १०० फुलझाडांचे वाटप करून हरित घर या संकल्पनेस बळ दिले. सोबत स्व. राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर चौक दुभाजकातील झाडांना भरपूर पाणी दिले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.