मुख्यमंत्री साहेब सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या - अक्षय धावारे
लातूर,प्रतिनिधी;-
सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे एकीकडे सामान्य जनता या भयानक महामारी पासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे जगण्यासाठी धडपड करत आहे परंतू राज्य सरकारने कसलीही योजना अद्याप पर्यंत आखली नाही गोर गरीब कष्टकरी वर्ग अन्न धान्यापासून वंचित आहे कोरोना काळामध्ये हातावर पोट असणाऱ्या लोकांचे बेहाल होत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या जनतेच्या प्रश्नाकडे अद्यापही लक्ष दिले नाहीत गोर गरीब सामान्य जनता पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लागल ते काम करण्यासाठी रस्त्यावर येत आहे इथे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामध्येच पोलीस अधिकारी म.न.पा कर्मचारी दंडात्मक कारवाई करून लोकांना नाहक ञास देत आहेत महाराष्ट्र सरकारने यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे लॉकडाऊनच्या नावाखाली सामान्य नागरीकांना होणारा ञास तात्काळ थांबला पाहिजे हातावर पोट असणाऱ्या लोकांना अन्न धान्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या नावाखाली होणारी लूट तात्काळ थांबली पाहिजे सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष दिले पाहिजे शिवभोजन जनतेसाठी खुले असले तरी त्यासाठी पोलीसांचा मार खावा लागत आहे मुख्यमंत्री साहेबांनी वेळीच लक्ष घातले पाहिजे कारण कोरोनाने मरण्या आगोदर उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ प्रश्नावरती निर्णय घेऊन सामान्य जनतेला आधार द्यायला पाहिजे असे भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.