विकासाची गंगा वाहत ठेवण्यासाठी आ अभिमन्यू पवार यांना संधी द्या - माजीमंत्री बसवराज पाटील
आमदार अभिमन्यू पवार विकासाची दूरदुष्टी असणारे नेतृत्व - माजीमंत्री बसवराज पाटील
औसा - औशाच्या विकासासाठी अनेकांना काम संधी मिळाली मलाही दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली अन्यही आमदारांना दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्यांचे नाव मी घेणार नाही आणि आमदार अभिमन्यू पवार यांनाही पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली या सर्वांच्या कामाचे मुल्यांकन जनतेने केले पाहिजे.आमदार अभिमन्यू पवार यांना विकासाची दूरदुष्टी आहे. त्याच्याकडे विकासाचा विचार आहे. त्यांना जनतेसाठी सातत्याने काही तरी करावे असे वाटते लोकांनी निवडून दिल्यावर कामाच्या रुपाने जनतेला न्याय मिळवून द्यावा या विचाराने प्रेरित होऊन ते काम करीत असतात त्यांना आपण २०१९ ला निवडून दिलात आणि या पाच वर्षांत त्यांनी विकासाची गंगा या मतदारसंघात आणली हि विकासाची गंगा अशीच वाहती ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन माजीमंत्री बसवराज पाटील यांनी केले आहे.
महायुती चे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ (दि.७) नोव्हेंबर रोजी लामजना येथील सभेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री बसवराज पाटील पुढे म्हणाले की मला या तालुक्यातील जनतेने दहा वर्ष काम करण्याची संधी दिली या मतदारसंघात विकासाचा खुप मोठा अनुशेष होता तो भरून काढण्याचा प्रयत्न मी त्या काळात केला २०१९ ला आमदार अभिमन्यू पवार यांना आपण निवडून दिलात दरम्यान या तालुक्यातील एक महत्त्वाचा लातूर - लामजना - उमरगा - गुलबर्गा हा महत्त्वाचा रेल्वे विषय राहून गेला होता.त्या विषयासंदर्भात दिल्ली वरून मला आमदार अभिमन्यू पवार यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की आपण सुरुवात केलेल्या या रेल्वेच्या विषयाला मी पुढे घेऊन जात आहे यामध्ये आपली मदत मला हवी आहे. त्यावेळी मला खात्री झाली की मी केलेल्या कामापेक्षाही अधिक विकासाची कामे आमदार अभिमन्यू पवार करू शकतात आणि सातत्याने मतदारसंघातील अनेक प्रश्नासंदर्भात ते माझ्याशी चर्चा करत असत त्यांनी या पाच वर्षांच्या काळात विकासाची कामे आपल्या मतदारसंघात कशी आणता येतील त्याला मुहूर्त स्वरूप कसे देता येईल जनतेला आधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून कशा देता येतील यासाठी सातत्याने काम केले आहे. खऱ्या अर्थाने येथील जनतेने कामाच्या माणसाला काम करण्याची संधी दिली असून पुढील काळात हि परंपरा कायम ठेवावी एकंदरीत पाच वर्षांत आ अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने मतदारसंघात एवढे विकासकामे झाले असून आशा लोकप्रतिनिधीला किमान पंचवीस वर्ष काम करण्याची संधी येथील जनतेनी दिली पाहिजे असा आशावाद यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त करून ते म्हणाले की येणाऱ्या काळात आपल्या कामातून आमदार अभिमन्यू पवार औशाच्या विकासाच्या माॅडेल ची ओळख देशात करून देतील त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले दरम्यान गुरुवारी आमदार अभिमन्यू पवार यांनी बुधोडा, सेलू, एरंडी, याकतपूर, कान्हेरी, जयनगर व खरोसा येथे बैठक घेऊन लोकांशी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे,सभापती चंद्रशेखर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, सरपंच महेश सगर, संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, शिवराज वाले, बालाजी शिंदे, महादेव कांबळे, यल्लाप्पा दंडगुले, युवराज बिराजदार, हाणमंत राचट्टे, अशोक शेळके, सचिन कांबळे आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.