लातूर शहर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी नियुक्त पथकांचे प्रशिक्षण पूर्ण • १५ व १७ नोव्हेंबर रोजी होणार गृह मतदान

 

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी नियुक्त पथकांचे प्रशिक्षण पूर्ण


• १५ व १७ नोव्हेंबर रोजी होणार गृह मतदान




लातूर, दि. ०८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ८५ वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची ऐच्छिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी १२ डी अर्ज भरून दिलेल्या मतदारांच्या घरी जावून त्यांचे मतदान करून घेतले जाणार आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात यासाठी नियुक्त मतदान पथकांतील अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाले.


निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सौदागर तांदळे, गणेश सरोदे, नोडल अधिकारी आर. एल. वडगावे, सहायक नोडल अधिकारी सुर्यकांत लोखंडे, सोमेश्वर होळकर, निवडणूक नायब तहसीलदार अर्चना मैंदर्गी यांच्यासह मतदान पथकातील अधिकारी, कर्मचारी व व्हिडीओग्राफार यावेळी उपस्थित होते.


लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील ३६८ मतदारांनी गृह मतदान सुविधेसाठी १२ डी अर्ज भरून दिलेला आहे. त्यांचे मतदान करून घेण्यासाठी २२ पथके, तसेच राखीव ३ पथके गठीत करण्यात आली आहेत. १५ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर रोजी गृह मतदान करून घेण्यात येणार असून ही मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी, मतदानाची गोपनीयता भंग होवू नये, यासाठी मतदान पथकातील अधिकारी, कर्मचारी, व्हिडीओग्राफर यांना मार्गदर्शन करण्यात आले.

***

Collector & District Magistrate, Latur

Chief Electoral Officer Maharashtra

Latur Police Department

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या