देवणी ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.अमित देशमुख यांची भेट

 

देवणी ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.अमित देशमुख यांची भेट,

कोविड १९ प्रादुर्भाव उपाययोजनाची माहिती घेऊन संबंधितांना केल्या सूचना.











लातूर प्रतिनिधी  १८ एप्रिल :

 राज्याचे वैद्यकीय शिक्षण  सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री नाअमित  विलासराव देशमुख यांनी आज रविवार दि१८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील देवणी इथल्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह या ठिकाणी आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन देवणी तालुक्यातील कोविड१९ प्रादुर्भाव उपाययोजना बाबत आरोग्य विभागाकडून माहिती घेतलीदेवणी येथील कोविड१९ प्रादुर्भाव रुग्णांचा मृत्युदर . इतका असून एकूण रुग्ण संख्या  ४२८ आहें . गंभीर रुग्णांना लातूर येथे उपचारासाठी पाठवले जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱयांनी दिली

    देवणी येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीची ८० बेड क्षमता असून देवणी ग्रामीण रुग्णालयात किमान  व्हेंटिलेटर बेड ची व्यवस्था करावीदेवणी येथून लातूर या ठिकाणी उपचारा करीता पाठविण्यात आलेल्या रुग्णाचे ऑडिट करावे  अहवाल सादर करावाआरोग्य अधिकाऱयांनी मुख्यालयी राहावेविनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करावीदेवणी ग्रामीण रूग्णालयाकरिता ऑक्सिजन युनिट सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावारुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावीयासह अन्य आवश्यक सूचना ना.अमित देशमुख यांनी यावेळी केल्यातसेच लॉकडाऊन काळात देवणी तालुक्यात कायदा  सुव्यवस्था आणि कोविड १९ नियमावलीचे पालनदंडात्मक कारवाई या विषयी देखील पोलीस विभागाकडून माहिती घेतलीदरम्यान देवणी येथील लोकप्रतिनिधी नागरिकांकडून प्राप्त निवेदनाची दखल घेत देवणी नवीन बस स्थानकाचे काम आठ दिवसात सुरू करण्यात यावे , देवर्जन प्रकल्पातून शेतकऱयांना पैसे भरून  मागणी करूनही  अद्याप पाणी मिळाले नाही या तक्रारींवर या प्रकारची चौकशी करावी .देव नदीवर केटी वेअर करीत प्रस्ताव दाखल करावा अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

   यावेळी जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराजमुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयलपोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अभय साळुंखेदिलीप पाटील नागराळकरडॉनीलकंठ सगरतालुका आरोग्य अधिकारी डॉ.डीडी.गुरमेतहसीलदार सुरेश घोळवेगट विकास अधिकारी मनोज राऊतदिलीप पाटीलपृथ्वीराज पाटील यांच्यासह देवणी ग्रामीण रुग्णालय अधिकारीकर्मचारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

  साकोळ येथे पालकमंत्र्यांनी केले वृक्षारोपण,

   मागण्यांच्या निवेदनांचा केला स्वीकार

 

कोविड १९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर शिरूर अनंतपाळ  देवणी तालुका पाहणी दौऱ्यावर असलेले पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी आज रविवारी सायंकाळी साकोळ या ठिकाणी थांबून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला .तसेच ना.अमित देशमुख यांनी यावेळी साकोळ मुख्य चौकात वृक्षारोपण करीत ग्रामस्थाची मागण्यांची निवेदने स्वीकारली  कोविड १९ नियमावलीचे पालन करावे ,आपली  कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी आबासाहेब पाटील उजेडकर,अभय साळुंकेसरपंच कमलाकर मादळेप्रा.जाभळेशिवाजी डोंगरे उपस्थित होते.

                                    *******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या