महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन
लोहरा शाहिद पटेल प्रतिनिधी
दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी शासनाचे विरोधात ग्राम पंचायत स्तरावरील एक दिवसीय कामबंद आंदोलन आयोजीत करण्यात येत आहे.... व मुंबई येथील आंदोलन स्थगित करण्यात येत आहे...
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 च्या कर्मचारी, पदाधिकारी यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी आझाद मैदान मुंबई येथे ग्राम पंचायत: कर्मचान्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम बंद व मुंबई येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यभरातून सर्व कर्मचारी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील सर्व पदाधिकारी मोठया ताकतीने प्रयत्न केले व प्रसिध्दी दिलेली
आहे. सर्वार्थ राज्य कार्यकारीणी आभारी आहे. परंतु राज्यात कोरोना विधान प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा महाराष्ट्र शासनाने 30 एप्रिल 2021 पावेतो लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने कलम 144 लागू केल्याने कर्मचान्यांना आपले गाव व घर सोडता येणार नाही. अश्या परिस्थीतीत आंदोलन तुर्त स्थगित ठेवणे हिताचे वाटते. भविष्यात कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाल्यानंतर आपणास योग्य न्यायासाठी आंदोलनाच्या मार्गाने पुढे जावे लागेल. ग्राम पंचायत स्तरावर काम बंद आंदोलन करण्याची पूर्व तयारी झाली असल्याने ग्राम
पंचायत स्तरावरील 19 एप्रिल 2021 रोजी एक दिवसिय काम बंद आंदोलन करण्यात यावे. सध्या राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव झापाटयाने वाढलेला आहे. हया परिस्थीतीत शासनाने लावलेला निर्वधावात गांभिर्याने विचार करून मा मुख्यमंत्री यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. करिता मुंबई येथिल आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. व दिनांक 19 एप्रिल 2021 रोजी शासनाचे विरोधात ग्रामपंचायतीच्या समोर एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात आष्टा कासार कर्मचारी
1 दायानंद विश्वनाथ टिकांबरे
2 जगन्नाथ तुळशीदास कागे
3 नागनाथ सिद्राम बबले
4 खंडूसेन यशवंत माने
हनीफ पटेल
बालाजी देडे सहभागी आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.