इंग्रजी शाळा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी दि.१ मे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना *(मेस्टा) राज्यव्यापी *'आत्मक्लेश आंदोलन करणार !* - संजयराव तायडे पाटील
औरंगाबाद ख़य्युम पटेल प्रतिनिधी
सरकार तर्फे महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उदरनिर्वाहा पुरते तरी मानधन द्यावे,*
महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी शाळांना सन २०१८पासून थकित आमच्या हक्काचे केंद्र सरकार द्वारे प्राप्त झालेले १८५० कोटी रुपये तात्काळ मिळावे.
गेल्या एक वर्षांपासून कोविड 19 च्या कहराने शाळा बंद, विदयार्थी येणे बंद, पालकांना फी देण्यापासून रोकणे पण त्यावेळेसच सगळे टॅक्सेस, बसचे हप्ते, इमारतीचे हप्ते,वीजबिल एक ना दोन सगळ्या खर्चाची सक्तीने वसुली करणे हे या राज्य सरकारने पक्के ठरवले आहे. यांच्या कानात बोळे बसलेत की यांनी मांजरासारखे डोळे मिटलेत कळत नाही. आज प्रत्येक शाळा संस्था चालक आर्थिक, मानसिक अडचणीत आहे. हे या सरकारला कळत नाही की सरकार मुद्दाम आम्हाला दुर्लक्षित करत आहे.,परिस्थिती गंभीर आहे, मान्य. पण आम्ही आमचेच हक्काचे आर टि ई चे पैसे मागितले. ४मार्च २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रातुन १५० निवेदने दिले,
दि ५ एप्रिल २०२१ ला २६८ तालुका व जिल्ह्याच्या जि प व पंचायत समितीच्या आवारात ५०कोटीचा आर टि ई परताव्याचा सरकारी GR च्या होळ्या केल्या. का? तर सरकारचं लक्ष वेधलं जावं. या सर्व इंग्रजी शाळांमधील शिक्षक उदर निर्वाहाचे साधन गेल्यामुळे हवालदिल झालेले आहेत, त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने, घरातील लहान मुले भुकेने व्याकुळ झालेली पाहून मनं सून्न होतायेत , त्यांच्याकडेही या मायबाप सरकारचं लक्ष नाहींय. या सर्व शिक्षकांना काही धान्य सरकारने द्यावे पण छे!आमच्या राजकारणी, वरपांगी मुखवटे लावलेल्या सत्तेत बसलेल्यांना कसलीही चाड नाही. माणुसकीचा अंत झालेला आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. किती पोट तिडिकीने सांगावं आता? महात्मा गांधी म्हणायचे "शस्त्रे घेऊन लढणं सोपं पण अंतःकरणात जर पाझर फोडायचा असेल तर अहिंसेला पर्याय नाही."
आता 'आत्मक्लेषा' शिवाय काही पर्याय दिसत नाही. जर त्यांना कळणारच नसेल तर आम्हांला आता 'आत्मक्लेश' करून घ्यावा लागेल.
महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील चौका - चौकात आणि जिल्ह्यातील
मध्यवर्ती चौकात महापुरुषांच्या पुतळ्याजवळ शांततेने 'आत्मक्लेषाचा' मार्ग हाताळू.
त्याशिवाय आमचे म्हणणे सरकारच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोचणार नाही.
*दि. :-१ मे २०२१ महाराष्ट्र दिन*
सकाळी ११:०० वाजता*
*स्थळ:- क्रांतीचौक औरंगाबाद*
या आंदोलन मधे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सामिल व्हावे असे आव्हान संजयराव तायडे पाटील,यांनी केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.