बियाणे व खते पुरवठा अनुषंगाने खरीप हंगाम पुर्व आढावा बैठकीचे आयोजन करावे - आ. अभिमन्यू पवार..
आ. अभिमन्यू पवार यांची पालकमंत्र्यांकडे मागणी.
औसा - गतवर्षी शेतकऱ्यांना बोगस व उगवण क्षमता कमी असलेले बियाणे विक्री झाले.यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणी करावी लागली.तसेच अतिवृष्टीने सोयाबीन पीकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांकडे स्वताचे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे.या परिस्थितीत योग्य दर्जाचे बियाणे व खतांची टंचाई निर्माण होवू नये यासाठी खरीप हंगाम पुर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
दि.२७ एप्रिल रोजी आ. अभिमन्यू पवार यांनी दिलेल्या निवेदनानुसार गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन सह इतर पिकाचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे स्वताचे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना बोगस व उगवण क्षमता अत्यंत कमी असलेले बियाणे विक्री झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. यावर्षी शेतकऱ्यांना उगवण क्षमता असलेले योग्य दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे व मागणी प्रमाणे खते पुरवठा करून देण्यासाठी बियाणे व खतांची टंचाई निर्माण होवू नये यासाठी आवश्यक नियोजन पेरणीपूर्व होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि त्यांची अंमलबजावणी याचा आढावा घेण्यासाठी तसेच राज्य स्तरावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत मागणी नोंदवणे व नियोजन करणे यासाठी खरीप हंगाम २०२१ पुर्व आढावा बैठक आयोजित करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
याबाबत जिल्ह्यातील खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक आॅनलाईन आयोजित करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.