महापालिकेच्या पुढाकारातून पत्रकार व कुटुंबियांना कोरोना लसीकरण
१०७ जणांनी घेतला लाभ
लातूर/प्रतिनिधी: महानगरपालिकेच्या पुढाकारातून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना लसीकरण करण्यात आले.८३पत्रकार कुटुंबातील २४ सदस्य अशा एकूण १०७ जणांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. महानगरपालिकेच्या वतीने शनिवार व रविवार असे दोन दिवस ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. पहिल्याच दिवशी या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांनीही लसीकरण करून घेतले. टाऊन हॉल येथील शिवछत्रपती ग्रंथालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता लसीकरणास प्रारंभ झाला.सायंकाळी ४ वाजेपर्यंत ८३पत्रकार व कुटुंबातील २४ सदस्यांनी लसीकरण करून घेतले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना लस दिली. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी लसीकरणाच्या ठिकाणी भेट देऊन मोहिमेची पाहणी केली.रविवारीही (दि.१८ एप्रिल)सकाळी १० ते ४ या कालावधीत ही मोहीम सुरू राहणार आहे.पत्रकार बांधवांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन मनपा व पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.