नुकसानग्रस्त गरजुंना संसारोपयोगी साहित्य भेट
लोहारा: शाहिद पटेल प्रतिनिधी
शहरातील सोनेलाल भजेलाल कुशवाह यांच्या कुडाच्या घराला आग लागून घरातील उपजिविकेचे सर्व साहित्य धान्य, कपडे, भांडी व इतर संसार उपयोगी साहित्य असे एकुण ३२ हजार रुपायाचे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व अमिन सुबेकर
मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत कुशवाह कुटुंबास संसार उपयोगी भांडी, धान्य व आवश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. यावेळी हाजी अमिन सुंबेकर, संस्थेचे अध्यक्ष महेबुब फकीर, सामाजिक कार्यकर्ते महादेव धारुळे, अमिन कुरेशी, युसुफ कुरेशी, जाकेर कुरेशी, सलीम कुरेशी, बाबा कुरेशी, रब्बानी फकीर, सैफन शेख आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.