कोपरा प्रकरणी पीडितेला न्याय देऊन कुटुंबाला संरक्षण द्यावे:- मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

 

कोपरा प्रकरणी पीडितेला न्याय देऊन कुटुंबाला संरक्षण द्यावे:- मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी
--------
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील कोपरा इथल्या पीडित मुलीला तात्काळ न्याय द्यावा व कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी केली आहे

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील व अन्य कार्यकर्ते आज लातूर येथील शासकीय रुग्णालयात पीडित मुलीची भेट घेतली आहे त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी माँ साहेब जिजाऊ अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रत महिला व मुलीवर अत्याचार होत आहेत हे सहन केले जाणार नाहीत कोपरा इथल्या गरीब मुलीवर व असह्य मुलीवर व कुटुंबातील सदस्यांवर खोट्या केसेस केल्या आहेत या तात्काळ रद्द कराव्यात पीडित मुलगी व कुटुंबाला संरक्षण द्यावे शासनाने सदरच्या पीडितेची पुनर्वसन करावे अशी मागणी मराठा क्रांति ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी केले 







--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या