*महाराष्ट्रातील सर्व मंदीराच्या दान पेटीतील पैसा गोर गरीब कोरोना रुग्नासाठी वापरण्यात यावा**
भिम आर्मीचे मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे याची मागणी
लातुर प्रतिनिधी:-
लातुर:- गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी कोविड 19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय महाराष्ट्राची परिस्तिती बघता महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत त्यात रोजच्या रोज नवीन रुग्ण यांची भर पडत आहे बहुतेक जिल्ह्यात बघावयास मिळते त्यात भर म्हणजे खाजगी रुग्णालय (कोविड़ 19)साठी ज्यांना परवानगी दिली आहे त्यांनी तर बाजार मांडला आहे.गोर गरीब जनतेकडे त्यांचे पुर्ण दुर्लक्ष झाले आहे परिणामी मृत्यु संख्या कमालीची वाढली आहे गोर गरीब लोकांकडे कोविड 19 औषधे खरेदी करण्यासाठी पैशाची कमतरता भासत आहे , औषधांच्या पुरतता होत नसल्याने गोर गरीब लोक हे मृत्यू मुखी पडत आहेत त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील जे मोठ मोठी मंदीर आहेत त्या मंदिरातील दान पेटीतील पैसा हा गोर गरीब कोविड 19 रुग्नांसाठी वापरण्यात यावा जेने करुन गोर गरीब लोकांचे प्राण वाचले जातील
महोदय परिस्थिती खुपच दयनीय झालेली आहे सामान्य माणूस पुर्ण पणे उध्वस्त झालेला आहे. यावर लवकर अंमलबजावणी व्हावी ह्याच अपेक्षेसह..भिम आर्मीच्या मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धजी ठाकरे यांचे कडे हाक
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.