लातुर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत नी गावागावात निर्जंतुकीकरण फवारणी करावी
भिम आर्मी मराठवाडा संघटक प्रमुख मिलिंद ढगे
लातुर प्रतिनिधी:-
सध्याच्या परिस्थितीत दिवसागणिक कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सरकार कोरोनाला आटोक्यात आणण्याचा सर्वोतोपरी शर्तीचे प्रयत्न करत आहे .पण काही ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे तरी सर्व नागरिकांनी स्वतः बरोबर इतरांची काळजी घेणे गरजेचे असून यासाठी गावे कोरोना मुक्त करावयाचे असतील तर ग्रामपंचायत ने ही गावकऱ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे .म्हणून गावातील नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत मास्क, सॅनिटीझर वाटप करावे, व गावातील गल्ली बोळात व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरणाची फवारणी करावी असे भिम आर्मीचे मराठवाडा संघटक याची शासनाला मागणी केली जात आहे. मागणी मान्य नाही झाल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.