*लातूर शहरातील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी असलेल्या पत्रकार व नातेवाईकासाठी पत्रकार भवन येथे निवासाची सोय उपलब्ध केली* ---- लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील असंख्य रुग्णांना स्थानिक पातळीवरून मदतीचा हात दिला जात आहे. लातूर जिल्ह्यात covid-19 आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजाराला लातूर जिल्ह्यातील असंख्य पत्रकारांचे नातेवाईक व पत्रकार बळी पडत आहेत. ते सध्या लातूर शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत अथवा विचारणा करत आहेत. लातूर जिल्ह्यातील पत्रकार व त्यानंच्या कोणत्याही नातेवाईकाचा रुग्ण लातूर येथे उपचारासाठी दाखल असेल आणि त्यांच्या नातेवाईकांची निवासाची व भोजनाची सोय होत नसेल तर त्यांच्यासाठी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची इमारत (पत्रकार भवन ) सर्व सुविधेसह उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून केली जात होती. यावर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत लातूर जिल्ह्यातील पत्रकार किंवा त्यांच्या जवळचे नातेवाईक उपचारासाठी लातूर येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात दाखल झाला असेल परंतु त्यांच्या नातेवाईकांची निवासाची व भोजनाची सोय होत नसेल तर त्यांच्यासाठी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत निवास व भोजनाची मोफत सोय करावी. असा ठराव मंजूर करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघाच्या सदस्यांना आवाहन करण्यात येते की आपला सदस्य नातेवाईक यांच्यासाठी निवास व भोजनाची मोफत सोय लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत करण्यात आली आहे. यासाठी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे संपर्क करावा असे आवाहन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, उपाध्यक्ष महादेव कुंभार, सचिव सचिन मिटकरी, संगम कोटलवार, रघुनाथ बनसोडे, त्रयंबक कुंभार, काका घुटे व कार्यकारिणीच्या सदस्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.