आ. अभिमन्यू पवार यांच्या शिफारशीनुसार मतदारसंघातील १ कोटी ९ लाखांच्या कामांना मंजुरी
औसा प्रतिनिधी
आ. अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कामासंदर्भात शिफारस केलेल्या मतदारसंघातील १ कोटी ९ लाख रुपयांच्या विकास कामांना मुलभूत सुविधा अंतर्गत मंजूरी मिळाली असून यामध्ये मतदारसंघातील अकरा कामांचा समावेश आहे. आ. अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ३ कोटी रुपयांच्या विकास कामासाठी शिफारस केली होती.यापैकी १ कोटी ९ लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली असून यामध्ये प्रामुख्याने आपचुंदा केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यां बांधकाम १० लाख, कासारसिरसी येथील राज्य मार्ग रस्ता दुभाजक पथदिवे बसवणे १० लाख, लाडवाडी अंतर्गत रस्ते काम १५ लाख रुपये, केंगलवाडी येथील सभागृह बांधकाम १० लाख रुपये, तुंगी खु येथील सभागृह १० लाख, आलमला तांडा सभागृह बांधकाम ७ लाख रुपये, औसा तांडा स्मशानभूमी बांधकाम ७ लाख रुपये, उत्का भाग अ गाव अंतर्गत रस्ते ८ लाख रुपये,एकंबी वाडी येथील सभागृह बांधकाम ८ लाख रुपये, हरिजवळगा ग्रामपंचायत इमारत बांधणे १५ लाख रुपये, मातोळा गाव अंतर्गत रस्ते विकास ९ लाख रुपये आदी कामांचा यामध्ये समावेश आहे. औसा मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात आ. अभिमन्यू पवार हे सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून निधी मंजूर उपलब्ध करून आणत असतात यामुळे मतदारसंघातील विकास कामांना अधिक गती मिळत असून आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने येणाऱ्या काळात या विकास कामात अधिकच भर पडणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.