*स्थानिक गुन्हे शाखेचे कडून चार घरफोड्या उघड, 02 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*
या बाबत थोडक्यात हकीकतअशी की, लातूर जिल्ह्यात झालेल्या घरफोड्यातील चोरट्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.हींमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आले होते.
सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बहुरे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, रामहरी भोसले, हरून लोहार ,प्रदीप चोपणे, नागनाथ जांभळे यांच्या समावेश होता. घरफोडी उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने तपास पथक वेळवेगळ्या मार्गाने तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत होते.
दिनांक 27/05/2021 रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर संशयित आरोपी नामे कृष्णा श्रावण शिंदे, वय 21 राहणार- सुंबा, जिल्हा-उस्मानाबाद याला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करून तपास करण्यात आला त्या दरम्यान नमूद आरोपीने सदरचे घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल करून त्याने घरफोडीत चोरी केलेला मुद्देमाल एक मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि 6 मोबाईल असा एकूण 2 लाख 12 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्याने त्याच्या इतर साथीदारांसह पोलीस स्टेशन मुरुड,किल्लारी,भादा आणि एमआयडीसी या हद्दीमध्ये केलेले 04 गुन्हे कबूल केले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.