कोरोनाच्या संकटकाळात 10 वर्षीय मुलीने केली वाढदिवसानिमित्त आर्थिक मदत...
मुख्तार मणियार
औसा/ प्रतिनिधी :- सध्या राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन काळात अनेक कोरोना बाधित रुग्णांना याची झळ बसत आहे. अशा बिकट परिस्थितीत औसा येथील 10 वर्षीय मुलीने आपल्या आजच्या दिवशी वाढदिवसानिमित्त जमा केलेले पैसे कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवणासाठी एक माणूसकीच्या मदतीचा हात म्हणून येथील औसा पत्रकार मित्रांकडे पैसे जमा केले आहे.
याबाबत माहिती की, औसा येथील फुले नगर स्थितीत कु. श्वेता विनोद जाधव वय 10 वर्षीय मुलीने आपल्या 10 व्या वाढदिवसाला
आज्जी ने दिलेले पैसे गेल्या 3 महिन्यानी जमा करत आपला वाढदिवस साजरा करण्याचा विचार केला होता. पण वाढदिवस हा दि. 6 मे 2021 गुरुवार रोजी साजरा करण्यापेक्षा पैसे चांगल्या कामासाठी देऊ असा विचार मुलीच्या मनात आला व पटकन आपल्या वडिलांना ही कल्पना सुचवली व घरात चर्चा करून ही जमवलेले पैसे औसा येथील पत्रकारांनी कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था केल्याने आपण ही त्यांना वाढदिवसा निमित्ताने जमवलेले पैसे जेवणासाठी देवू असा निश्चय करून मानवतेच्या सेवेत सहभाग घेतल्याने कु. श्वेता विनोद जाधव या 10 वर्षीय मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.