कोविड मदतीला मराठवाड्याचे दोन पँथर सरसावले* (रिपाई डेमोक्रॅटिक कडून 500 ऑक्सिजन सिलेंडर)

 *कोविड मदतीला मराठवाड्याचे दोन पँथर सरसावले*

(रिपाई डेमोक्रॅटिक कडून 500 ऑक्सिजन सिलेंडर)






*मुंबई दि (प्रतिनिधी) कोविड सदृश्य परिस्तिथी हाताबाहेर जात ऑक्सिजन च्या कमतरते मुळे जीवितहानी होत असताना प्राणवायू ची मदत करण्यास रिपब्लिकन पार्टी इंडिया पदाधिकारी मराठवाड्याचे भूमिपुत्र कनिष्क कांबळे व डॉ राजन माकणीकर पुढे सरसावले.*


मेक इन इंडीया च्या नावावर देशाला भीकेला लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असून महाराष्ट्र राज्यसह संबंध भारतात मृत्यूने तांडव माजवले आहे. सरकारी यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली आहे, जनता मात्र हवालदिल झाली आहे.

जीवन जगण्यासाठी माणूस वाचवण्यासाठी चाललेली कसरतिला हवे तसे यश मिळत नाही.


खाजगी रुग्णालये माणुसकी ची किंमत अव्वाच्या सव्वा लावत असून शासकीय रुग्णालये सुविधे अभावी माणूसपण वाचण्यासाठी धडपडत असतांना  प्रशासन कमी पडत आहे, भारतातील प्रत्येक मंत्री अब्जोपती असून या दयनीय परिस्तिथीत हे मंत्री गन जनतेला मदत मागत आहेत ही देशाची शोकांतिका आहे.

मात्र त्यात रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाने केलेले कार्य म्हणजे धन व जात दांडग्या पक्षांना लाजवणारे आहे.


मात्र: मराठवाड्याच्या भूमीतील लातूरचे दोन पँथर्सनि मात्र: माणूस वाचवण्यासाठी आपल्यातला माणूस जागविला आणि 500 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर मुंबईतील ट्रस्ट व शासकीय रुग्णालयात मोफत वाटप करण्याचा निर्णय घेऊन नुकतीच ऑक्सिजन प्लांट ला ऑर्डर दिली आहे.

ज्यांना कुणाला पाहिजे असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी केले आहे.


माजी आमदार दिवंगत टी एम कांबळे यांनि स्थापन केलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक  पक्ष सध्या पक्षप्रमुख कनिष्क कांबळे व राष्ट्रीय महासचिव डॉ. माकणीकर यांच्या माध्यमातून माणूसपण जपण्यासाठी प्राणवायूचे मोफत वाटप करत आहे.


पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यंनि रीपब्लिकन भवन रिकामे करून कोरोना रुग्णासाठी वापरण्यास देण्याचे आधीच जाहीर केले असून पक्षाच्या वतीने योग्य परिस्तिथीत योग्य काम केली जात आसल्यामुळे रिपाई डेमोक्रॅटिक जनतेच्या पसंतीस येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या