'लहुजी शक्ति सेना' चे प्रदेश अध्यक्ष 'सोमनाथ कांबळे' यांचे निधन.
प्रतिनिधी उस्मानाबाद.इस्माईल तालिकोटे
जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील काटगाव गावचे सुपुत्र तथा 'लहुजी शक्ती सेना' चे प्रदेशाध्यक्ष "सोमनाथ भाऊ कांबळे" यांचे सोलापूर शहरातील मार्कंडेय रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. ते काटगावच्या सरपंच नगिनाताई कांबळे यांचे पती होते. त्यांच्या पश्चात 2 मुले, पत्नी, आई, भावजयी असा परिवार आहे. दुर्दैवाने तीन दिवसापूर्वीच ( 2 मे ) त्यांच्या लहान भावाचे देखील निधन झाले होते.
उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मराठवाडा प्रमुख ते प्रदेशाध्यक्ष असा प्रवास करत ते मातंग समाजातील तरुणांचे आदर्श होते. मातंग समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केले होते. विधानभवन परिसरात "अण्णा भाऊ साठे" यांचा पुतळा बसवावा यासाठी त्यांनी मुंबई मधील आझाद मैदानात मोर्चा काढला होता. त्यांच्या जाण्याने मातंग समाज आरक्षण आंदोलनाला खीळ बसली आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.