पत्रकारांच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करणार

 *पत्रकारांच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करणार !*


*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक डी.टी.आंबेगावे यांचा इशारा!*





 मुंबई : पत्रकारांच्या विविध मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विविध मागण्यांचे नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. मध्य प्रदेश व बिहारच्या सरकारने पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर श्रेणीची मान्यता दिली असून नवीनच स्थापण झालेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुद्धा  पत्रकारांना फ्रन्टलाईन पत्रकार म्हणून घोषित केले आले आहे पण महाराष्ट्रात मात्र लॉकडाऊन व संचारबंदी काळात पत्रकारांना बातमी संकलनासाठीही मर्यादा घातल्या जातात ही खेदाची बाब आहे, महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले होत आहेत यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. पत्रकारांना सरकार जर वाऱ्यावर सोडत असेल तर भविष्यात राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

डी. टी. आंबेगावे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सरसकट पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर श्रेणीची मान्यता द्यावी, दिवंगत पत्रकार कुटुंबियांच्या खात्यावर पाच लाख रुपये जमा करावे, खाजगी रुग्णालयात पत्रकारांना राखीव बेडची व्यवस्था करावी, पत्रकारांना लवकरात लवकर लस देण्यात यावी, पत्रकारांना ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व रुग्णालयांना सूचना द्याव्यात, पत्रकारांना वेळेवर अॅम्बुलन्स मिळावी, कोविड १९ व लॉकडाऊमुळे पत्रकारांचे जगणे कठीण झाले असल्याने सरसकट पत्रकारांच्या खात्यावर पंधरा हजार(१५,००० /-) रुपये तात्काळ जमा करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

  गेल्या एक वर्षामध्ये १२० पेक्षा जास्त पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून पत्रकारांचा मृत्यू होणे ही धोक्याची घंटा आहे त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याकडे आपण स्वतः लक्ष घालावे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या