गंगापूर व कव्हा येथे उप विभागीय अधिकारी तहसीलदार यांनी गावामध्ये भेट

 


मौजे गंगापूर व कव्हा येथे कोरोना पेशंट वाढत असल्याने उप विभागीय अधिकारी लातूर सुनील यादव तहसीलदार स्वप्निल पवार गट विकास अधिकारी गोडभरले यांनी गावामध्ये भेट देऊन सरपंच तलाठी ग्रामसेवक आरोग्य सेवक आशा कार्यकर्ती यांची आढावा बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या. सोबत कन्हेरी मंडळ अधिकारी संजय घाडगे व गातेगाव मंडळ अधिकारी चव्हाण उपस्थित होते. यावेळी गंगापूर चे सरपंच बाबुराव खंदाडे व कव्हा चे सरपंच किशोर घार यांनी कोरोना पेशंट वाढी बाबतच्या समस्या मांडल्या. त्यावर उप विभागीय अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन यापुढे कोरोना पेशंट वाढणार नाहीत याबाबत सर्व संबंधितांना सुचना केल्या. यावेळी कव्हा चे तलाठी साईनाथ सुर्यवंशी गंगापूर चे तलाठी माधव गोरे ग्रामसेवक परचंडराव आरोग्य सेवक आशा कार्यकर्ती उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या