स्थानिक गुन्हे शाखा ची कामगिरी.12 लाख 78 हजार रुपयाचा देशी दारुचा मुद्देमाल हस्तगत.. तसेच एका चोरीच्या गुन्ह्याची उकल करून चोरीस गेलेला 74 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत..*



    


 *स्थानिक गुन्हे शाखा,लातूर ची  कामगिरी.12 लाख 78 हजार रुपयाचा देशी दारुचा मुद्देमाल हस्तगत.. तसेच एका चोरीच्या गुन्ह्याची उकल करून चोरीस गेलेला 74 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत..*







लातूर प्रतिनिधी   *दिनांक:18/05/2021*

                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी चोरी गुन्ह्याची उकल व अवैध धंद्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आले होते. त्यापैकी एका पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे पोलिस ठाणे देवणी हद्दीत विनापास परवाना देशी दारूची अवैध विक्री/ व्यवसाय करण्यासाठी देशीदारूची वाहतूक करण्यात येत आहे.अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरोळ चौकात सापळा लावला.थोड्याच वेळात मिळालेल्या बातमी नुसार एक पांढऱ्या रंगाची पिकअप व्हॅन क्रमांक एम.एच.24 ए. यु.-5156 अशी रोडने येताना दिसली.पथकाने सदर पिकअप व्हॅन ला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूचे 194 बॉक्स व 174 देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या.

               त्यावरून देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारे 1)नागनाथ गंगाधर बिराजदार, वय 28 वर्ष, राहणार- वडमुरंबी, तालुका देवणी 2)सागर मोरखडे, राहणार-निटूर तालुका शिरूर आनंतपाळ यांचे विरोधात पोलीस ठाणे देवणी येथे गुरनं 457/2021 कलम 269,188 भादवि, कलम 65(अ)(ई), 81,83 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम 51,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, covid-19 उपाय योजना नियम 2020 चे नियम 11 व साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1997 चे कलम 234 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार श्री. कांबळे हे करत आहेत.

                   तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या पथकाने पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याची  उकल करण्यात यश मिळवले असून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या 3 हॉर्स पावर च्या 3 मोटर्स पंप व एक मोटर सायकल असा एकूण 74 हजार रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्यातील अल्पवयीन चोरट्यांकडून हस्तगत केला आहे.

             सदरच्या पथकात पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सपोनि बहुरे, सपोउपनि संजय भोसले पोलीस अमलदार रवी गोंदकर, बालाजी जाधव, यशपाल कांबळे, नाना भोंग, सचिन धारेकर, बंटी गायकवाड, राहुल सोनकांबळे , भिष्मानंद साखरे , प्रदीप चोपणे यांचा सहभाग होता.





,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या