ऊटी तलाव ते फिल्टर लोखंडी पाईपलाईनचे शुभारंभ
औसा मुख्तार मणियार
औसा नगर परिषद स्थापने पासून असलेली उटी तलाव ते फिल्टर पर्यंतची सिमेंटची पाईपलाईन जी जीर्ण व सारखी फुटून चार चार दिवसाला अडथळा होत होता. त्या अनुषंगाने त्या जागी नवीन लोखंडी पाईप लाईन टाकण्यात आली. ऊटी तलाव ते फिल्टर नवीन लोखंडी पाईप लाईन मध्ये पाणी भरुन घेतले . त्याचे आज दिनांक 18 मे 2021 मंगळवार रोजी डॉ. अफसर शेख नगराध्यक्ष औसा- लातूर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी लातूर ग्रामीण यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी आम्ही औशाच्या पाण्याची कीड काढली..आता विरोधक म्हणत आहेत औशाच्या विकासासाठी बाबासाहेबच असे डॉ.अफसर शेख यांनी म्हणाले. या शुभारंभ प्रसंगी माजी नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष जावेद शेख,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, बासीद भाई शेख आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.