वृत्त क्र.379
*लातूर शहराला 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत पाईप लाईनद्वारे
घरगुती गॅस पुरवठा झाला पाहिज
*-पालकमंत्री अमित देशमुख*
*गॅस कंपनीने लातूर शहराला पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस पुरवठा करण्याबाबतचा मास्टर प्लॅन तयार करावा*
*अशोका कंपनीने लातूर येथील उद्योगांनाही पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याबाबतचे नियोजन करावे*
लातूर, दि.28(जिमाका):- लातूर शहरातील ग्राहकांना पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस पुरवठा करण्याबाबत अशोका गॅस कंपनीचे कंपनीने शहरातील काही भागाचे सर्वेक्षण केलेले आहे. तरी कंपनीने लातूर शहराला घरगुती गॅस पुरवठा करण्याबाबतचा संपूर्ण मास्टर प्लॅन तयार करावा व त्यानुसार दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीने लातूर शहरातील ग्राहकांना घरगुती गॅस पुरवठ्याचे कनेक्शन द्यावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित लातूर शहर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. संभाजी सूळ, महापालिकेचे नगर अभियंता तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, ॲड. किरण जाधव, अभियंता श्री. स्वामी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, अशोका गॅस कंपनीने लातूर शहरात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी मागितलेली आहे व त्यासाठी भरपाई रकमेबाबत सवलतही मागितलेली आहे. महापालिकेने ही सवलत नियमानुसार देणे शक्य आहे का त्याची पडताळणी करावी. जर अशी सवलत देणे शक्य असेल तर रस्ता खोदाई च्या कामाची एकूण रक्कम कंपनीकडून अगोदर भरून घ्यावी नंतरच रस्ता खोदण्याची परवानगी द्यावी. तसेच गॅस कंपनीने घरगुती गॅस वापर वापरकर्त्यांना प्रति किलो गॅस दरात ही सवलत द्यावी जेणेकरून मोठ्या प्रमाणावर कंपनीला ग्राहक मिळतील व या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल असे त्यांनी सूचित केले.
गॅस कंपनीने लातूर शहरातील उद्योजकांनाही पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बसून चर्चा करावी. त्याकरिता एमआयडीसी ही गॅस कंपनी ला चेंबर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देईल. उद्योजकांनी गॅसचा वापर केल्यास विजेचे हि मोठ्या प्रमाणावर बचत होणार असल्याची माहिती पालकमंत्री देशमुख यांनी दिली.
अशोका गॅस एजन्सी ला लातूर शहरात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याबाबतचे काम देण्यात आलेले असून त्या कंपनीचे शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. तरी कंपनीने प्रथम राजीव गांधी चौक ते शिवाजी चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील भागाचे सर्वेक्षण करून या भागाला घरगुती गॅस कनेक्शन प्रथम देण्याचे सूचना केली. तसेच या कंपनीची पाईपलाईन आशीव पर्यंत आलेली आहे आहे तरी एमआयडीसीने आशीव गावाच्या परिसरात एमआयडीसीसाठी पाचशे ते एक हजार एकर जागा उपलब्ध होईल का याची पडताळणी करावी असेही त्यांनी सूचित केले.
अशोका कंपनीचे फिल्ड ऑफिसर गुरव म्हणाले की प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तीन महिन्यात लातूर शहरातील ग्राहकाला घरगुती गॅस कनेक्शन कंपनीकडून देण्यात येईल तसेच रत्नागिरी येथे कंपनीने काम केलेले असून रत्नागिरी शहराततील ग्राहकांना अंदाजे प्रति किलो 32 रुपये घरगुती गॅसच्या वापरासाठी चार्जेस पडतात, अशी माहिती देऊन लातूर महापालिकेने कंपनीला रस्ते खोदण्याची भरपाई बाबत सवलत द्यावी अशीही मागणी त्यांनी केली.
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर महापालिकेला जीएसटी मधून अधिकचे सहाय्यक अनुदान मिळण्याबाबत चा प्रस्ताव महापालिकेने तात्काळ तयार करावा असे निर्देश दिले. तसेच यावेळी महापालिकेने त्यांच्याकडील गाळ्यांचा भाडेकरार, विवेकानंद चौकात महापालिकेच्या जागेत व्यवसायिक गाळे इमारत बांधण्याबाबत, अण्णाभाऊ साठे नगर येथे मल्टी स्टोअर पार्किंग इमारत बांधण्याबाबत च्या कामाचा तसेच अमृत योजना सोलार प्रकल्प शहराला चोवीस तास पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन आदी कामांचा सविस्तर आढावा पालकमंत्री देशमुख यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी ही मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी ही अनुषंगिक बाबीवर आपले विचार मांडून मार्गदर्शन केले.
प्रारंभी महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी लातूर शहर महानगरपालिकेला जीएसटी कडून मिळणारे अनुदान कमी असल्याचे सांगून अधिक मिळण्याबाबतसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. तसेच महापालिके कडील गाळ्यांचे भाडे करार करार करणे, महापालिकेच्या मालकीच्या जागेवर पार्किंग व्यवस्था, अमृत योजना, सोलार प्रकल्प, इ-गव्हर्नर्स, वॉटर टॅक्स, घनकचरा व्यवस्थापन व नाट्यगृह आदी बाबतची माहिती बैठकीत दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.