पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 16 ऑगस्ट पासून घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांचे निर्देश

 

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 16 ऑगस्ट पासून घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्रीअमित देशमुख यांचे निर्देश









मुंबई (दि. 27)-

 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.16 ऑगस्ट 2021 पासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री मानाश्रीअमित देशमुख यांनी दिले.

        उन्हाळी सत्र 2021 मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मानाश्रीअमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आलीया बैठकीस माप्रभारी कुलगुरु डॉ.नितीन करमळकरवैद्यकीय शिक्षण  औषधी द्रव्ये विभागाचे मा.सचिव श्रीसौरव विजयसंचालकवैद्यकीय शिक्षण  संशोधन संचालनालयाचे मासंचालक डॉतात्याराव लहानेकुलसचिव डॉकालिदास चव्हाणपरीक्षा नियंत्रक डॉअजित पाठकविद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे माअधिष्ठाता डॉसचिन मुंबरेडॉजयंत पळसकरडॉश्रीकांत देशमुखडॉधनाजी बागलडॉराजश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

     विद्यापीठाचे प्रति-कुलपती मानाश्रीअमित देशमुख यांनी सांगितले कीविद्यापीठाची उन्हाळी सत्र 2021 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा दि. 24 जून 2021 पासून नियोजित करण्यात आली होतीकोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होतीयामुळे परीक्षेच्या तयारीकरीता विद्यार्थ्यांना 45 दिवसांचा कालावधी मिळेल.

      ते पुढे म्हणाले कीविद्यार्थ्यांची लेखी  प्रात्यक्षिक परीक्षा कोविड-19 आजारासंबंधी शासनाने निर्देशित केलेल्या सर्व सुरक्षिततेचे नियम पाळुन घेण्यात याव्यातविद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी -पास म्हणुन विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे प्रवेशपत्र वितरीत केले जाणार आहेत्यालाच -पास ऐवजी मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

       ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली आहेपरंतू लेखी परीक्षा दिल्यानंतर  प्रात्यक्षिक परीक्षेआधी ज्या विद्यार्थ्यांचा कोविड-19 अहवाल सकारात्मक आला आहेअशा विद्यार्थ्यांची विलगीकरण कालावधीनंतर स्वतंत्रपणे त्याच प्रात्यक्षिक परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येतीलतसेच जे विद्यार्थी लेखी परीक्षेआधी कोविड-19 अहवाल सकारात्मक आल्यामुळे लेखी परीक्षेस बसु शकले नाहीतअशा विद्यार्थ्यांची पुर्नःपरीक्षा घेण्याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

       या ऑनलाईन बैठकीस उपस्थितांचे विद्यापीठाचे माकुलसचिव डॉकालिदास चव्हाण यांनी आभार मानलेविद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती  वेळापत्रक लवकरच विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in  वर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

                          -----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या