औसा तालुक्यातील सरपंचाने विवाहाचा नियम मोडला,पित्यास 50 हजाराचा दंड
औसा प्रतिनिधि
औसा: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रसार रोखण्यास यावा या उद्देशाने कडक निर्बंध लादले आहेत.25 नातलगांच्या उपस्थित विवाह समारंभ दोन तासातच आटोपून घ्यावा असा नियम घालून दिलेला असताना विवाह समारंभात कोरोना चा नियम मोडल्याबद्दल वर पित्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्याची खळबळजनक घटना औसा तालुक्यात घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,सोमवार दिनांक 3 मे 2021 रोजी औसा तालुक्यातील भंगेवाडी येथील निळकंठ माधवराव पाटील यांच्या मुलाचे (भंगेवाडीचे सरपंच वर असल्याचे समजते) लग्न कबन सांगवी तालुका चाकूर येथील नातेवाईकाच्या मुलीशी भंगेवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना गर्दी टाळण्याचे प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडून 25 पेक्षा अधिक लोकांना लग्नात जमा केल्याने व पन्नास हजार रुपयाचा रोख दंड ग्रामसेवकाने आकारून संबंधितास दंडाची पावती दिली.लग्नासाठी 25 पेक्षा अधिक नातेवाईक जमा होऊन गर्दी झाल्याचे कळताच त्यांनी थेट येथील बीट अंमलदार राजेश लामतुरे ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भंगेवाडी ता औसा येथे लग्नात गर्दी केल्याची तक्रार अनेकांनी वरिष्ठाकडे केल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन नवरदेवाच्या वडीलास पन्नास हजार रुपये रोख दंड आकारून दंडाच्या रकमेची पावती ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी निळकंठ माधवराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. विवाहसोहळ्यात नियमापेक्षा अधिक लोकांना सहभागी केल्याने आर्थिक दंड आकारण्याची औसा तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. विवाहाच्या कार्यक्रमात नवरदेवाच्या पित्याला 50 हजार रुपयांचा दंड झाल्याने औसा तालुक्यात खळबळ उडाली असून विवाह इच्छुकांनी या घटनेने पुढील काळात त्यांनी सावधानता बाळगली पाहिजे अशी प्रशासनाने अपेक्षा व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.