यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाचा कोरोनाबाधितांना आधार- सभापती रमेश सोनवणे
लातूर/प्रतिनिधी:सध्या कोरोना महामारीने भयानक स्वरूप धारण केलेले आहे. त्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णांची धावाधाव सुरू आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीत.अशा स्थितीत आ.रमेशअप्पा कराड यांचे योग्य नियोजन आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी रुग्णसेवा यामुळे यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय कोरोना बाधितांसाठी आधारवड ठरत असल्याचे मत रेणापूर पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे यांनी व्यक्त केले.
सभापती सोनवणे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातच उपचार घेतले.आता ते आजारातून ठणठणीत बरे झाले आहेत.
कोरोनाबाधित झाल्यानंतर रुग्ण घाबरून जातात.अशा स्थितीत आपणही होतो.परंतु एमआयटीच्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर माझी भीती पळून गेली.सभापती सोनवणे म्हणाले की,आ.
रमेशअप्पा कराड एक प्रशासक म्हणून किती उत्तम नियोजन करतात याचा अनुभव या काळात मला घेता आला.रुग्णांना आधार देण्यासोबतच सहकारी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे शेकडो रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी जात आहेत. डॉ.दैठणकर,भालेकर यांच्यासह सर्व डॉक्टर्स रुग्णांना दुरुस्त करण्यासाठी अखंड मेहनत घेत आहेत.
आज खाजगी रुग्णालयात लाखो रुपये मोजूनही सेवा मिळत नाही.वेळेवर औषध- उपचार केले जात नाहीत. परंतु एमआयटीमध्ये पैशांचा विचारच केला जात नाही. सामान्य नागरिक,गरजू कार्यकर्ता आणि फाटक्या माणसालाही सर्वोत्तम उपचार मिळावेत असा आ. रमेशअप्पांचा हेतू असतो. माणुसकीच्या भावनेतून जबाबदारीने उपचार केले जातात.उपचारा सोबतच रुग्णांना काय हवे ?काय नको? याची दक्षता घेतली जाते.परिसराच्या स्वच्छतेवर लक्ष दिले जाते.
आ.रमेशअप्पा यांनी 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा'असे केवळ न म्हणता प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून दिले आहे.आपला पहिला आमदार
निधी त्यांनी रुग्णवाहिकां साठी दिला तर दुसऱ्या आमदार निधीतून रुग्णालयातील साहित्याची खरेदी केली.
रेमेडीसिव्हर इंजेक्शनचा सर्वत्र प्रचंड तुटवडा आहे. अशा स्थितीत रुग्ण त्यासाठी हजारो रुपये मोजत आहेत. मनात आणले असते तर आ.कराड यांना या माध्यमातून दररोज लाखो रुपये कमावता आले असते. परंतु ज्या छापील किमतीमध्ये इंजेक्शन रुग्णालयाला मिळते त्याच किमतीत ते रुग्णांना दिले जात आहे.जेव्हढा कोटा शासनाकडून मिळतो तो पूर्णपणे छापील किंमतीवर रुग्णांना मिळतो.
लातूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता.अशा स्थितीतही आरोग्य व्यवस्था कोलमडू न देता एमआयटी मध्ये उपचार सुरू आहेत. खाटांची कमतरता लक्षात घेता आ.कराड यांनी आणखी १०० बेड कोरोना बाधितां साठी तयार ठेवले आहेत.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वात आ.कराड कार्य करत असत.त्यांच्याच विचारावर आजही त्यांची वाटचाल सुरू आहे.प्रस्थापित नेते संकटाच्या काळात कार्यकर्ते व नागरिकांना वाऱ्यावर सोडत असताना दीनदलित,कष्टकरी,सामान्य माणूस,फाटका कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू मानून त्यांना आधार देण्याचे काम आ.रमेशअप्पा कराड करत आहेत.आ.रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वातच आमच्यासारखे कार्यकर्ते जनतेसाठी काम करत आहेत.त्यांच्याच नेतृत्वात गरिबांसाठी विविध योजना राबवणे,सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करत असल्याचेही,सभापती रमेश सोनवणे यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.