पेट्रोल डिझेल गॅस रासायनिक खतांची दरवाढ कमी करा.... औसा तालुका काँग्रेस कमिटी ची मागणी
औसा प्रतिनिधी
संपुर्ण महाराष्ट्र सह राज्यात करोना महामारी हे भिषन संकट मागील एक वर्षापासून सुरु असतांना केंद्र सरकार कडुन दररोज पेट्रोल डिझेल च्या किंमती रोज रोज वाढत असून शासनाने पेट्रोल डिझेल गॅस व रासायनिक खतांच्या भरमसाठ प्रमाणात वाढविलेल्या किंमती कमी करावे अशी मागणी औसा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे करण्यात आली असून त्या आशयाचे निवेदन तहसीलदार औसा यांच्या मार्फत मा.पंतप्रधान यांना पाठवण्यात आले आहे.
ग्रामीण भागात पेरणी पुर्व मशागतीला सुरुवात झाली ऐन खरीपाच्या हंगामाला सुरुवात होण्याअधिच केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोल च्या किंमतीत भरमसाठ वाढ केली असून पेट्रोल व डिझेल च्या किंमती 100रू च्या जवळ आल्या आहेत. या मुळे शेतकऱ्यांना मशागती साठी ट्रॅक्टर ला इंधन आवश्यक आहे . कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून नागरिक मोठ्या संकटांचा सामना करीत आहेत.त्यांच्या समोर उपजिवीकेचा मोठ्ठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अशातच महागाई मुळे सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
ऐन पेरणीच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक खते यांच्या किंमती वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अधिकच आर्थिक गणित कोलमडले असताना सरकारने केलेली खत वाढीमुळे वर्गातून मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण झाली असून केंद्र सरकारने तात्काळ रासायनिक खतांच्या, पेट्रोल डिझेल, गॅससह इतर सर्व जीवनाश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती कमी कराव्यात असे निवेदन देण्यात आले या निवेदनावर तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, शहराध्यक्ष शकील शेख, प्रा.सुधीर पोतदार,सौ. मंजुषा हजारे,अंगद कांबळे, शाहनवाज पटेल, अल्ताफ देशमुख, बबन बनसोडे,खुंनमीर मुल्ला समियोद्दीन पटेल सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.