आजार हलगटाला अन् औषध पखालीला ; फडणवीसजींचे सोनियाला पञ , अस्सल बावळटपणा

 आजार हलगटाला अन् औषध पखालीला ;

फडणवीसजींचे सोनियाला पञ , अस्सल बावळटपणा !

-------- --------- ------------  -------- ---------  --------------





महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते , देवेंद्र फडणवीसजींनी एक चार पानाचं पञ काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना लिहलं.हिंदीतून लिहलेल्या या पञात फडणवीसांनी , महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव , निष्क्रिय आरोग्य यंञणा , आणि आघाडी सरकारचा खूप बेजबाबदारपणा खूप वाढला आहे, आपण मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला समज द्यावी असे या पञात म्हटले.कांही आकडेवारी समोर मांडून , महाराष्ट्र भाजपा या कोरोना काळात किती दक्षपणे काम करीत असल्याने नगारेही बडवले.

शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना पञ लिहून कोरोना लढ्यात केंद्र सरकारने अधिक मजबूतीने उतरावे असे म्हटले होते.आता गंमत अशी की , पंतप्रधान कधीही विरोधकांच्या पञांना उत्तरे देत नाहीत .प्रेस समोर जात नाहीत .( कशाला जातील ? प्रेसचं त्यांच्या जवळ गेलीय , अगदी बेडरुम पर्यंत ) 

नेमक्या अशा वेळी एक पञ देवेंद्र फडणवीसांनी सोनियाला पञ लिहून , आता पुढचा पंतप्रधान मीच , असे सुतोवाच केले .तर दुसरी कडे आपण राष्ट्रीय नेते आहोत , हे दाखवण्याचा प्रयत्नही केला .थोडं फेब्रुवारी मध्ये मागे जाऊ.

देशाच्या प्रमुख विषाणू संशोधकांनी , म्हणजे राष्ट्रीय प्रयोगशाळेतील पाच संशोधकांच्या गटाने भारत सरकारला कोरोनाची दुसरी लाट येणार व देशाची मोठी हानी होणार , असे सांगितले होते.माञ पंतप्रधान नरेंद्रभाईजींनी या महत्त्वाच्या सुचनेकडे पूर्ण दुर्लक्ष केले.(संदर्भ -राँइटर्स वृत्त , दिनांक 1 में 2021) या संशोधकाच्या टीमने , भारताचे मुख्य आरोग्य सचिव यांचे पर्यंत ही भीती कळविली होती.मुख्य आरोग्य सचिवांनी आरोग्यमंञी डाँ.हर्षवर्धन यांना , व आरोग्य मंञ्यांनी पंतप्रधान  यांना ही गंभीर बाब कळवीली होती.आणि इथेच उपाययोजना केली असती तर देशात दुसऱ्या लाटेची तीव्रता खूप कमी राहीली असती.प्राणहानी झाली नसती.पण समोर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका होत्या.ही पाचही राज्ये पंतप्रधानांना जिंकायची होती , शिवाय समोर आलेला कुंभमेळा भरवून धार्मिक धग , धगधगती ठेवायची होती.त्यामुळे थातूर मातूर कागद काळे करुन , मोदीजींनी निवडणूक प्रचार सुरु केला .भाषणांची हौस व टाळ्यांची भूक भागवण्याच्या नादात ,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आगमन झाले.हजारोवर लोक बाधित होऊ लागले.हजारो प्राण आँक्सिजन अभावाने जाऊ लागले.तेव्हा मोदी बंगालात " दीदी ओ दीदी , असे हिणकसं सुर  आवळू लागले.कुंभ भरला त्यात पन्नास ऐक लाख लोकांनी सहभाग घेतला.निवडणूका झाल्या , त्यात कोट्यावधी लोक एकत्र जमले.इथेच कोरोनाने भारताला विळखा घातला.याला जबाबदार फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदी आणि भाजपाची स्वार्थी वृत्ती !  त्यातही सर्वात मोठा कहर म्हणजे पंतप्रधान आणि संघ भाजपाचा विज्ञाना वरील अविश्वास , देव , माँ गंगा ,गोमुञ आदी अनादी गोष्टीवरचा अतिविश्वास.परिणामी लाखों लोक मेले.लाखो संसार उध्वस्त झाले.देश ठप्प झाला.देशाला आर्थिक दारिद्रय आले.कितीही नाकारले तरी या गोष्टी सत्य आहेत.भारतातील दलाल मिडियाने त्या सांगण्याची हिंमत केली नसली तरी संपूर्ण जगाने मोदींचा बुरखा फाडला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर झाला ,हे खरे आहे.पण याला केंद्रीय आरोग्य धोरण जबाबदार आहे.महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे.या राज्याचे रोजचे संबंध जगाबरोबर आहेत.देशातील लाख्खो लोक रोज महाराष्ट्रात येतात जातात ,त्यामुळे इथे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढणेही नैसर्गिक आहे.पण त्याला आघाडी सरकार जबाबदार आहे म्हणणे किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे बोट दाखवणे , बेलाशक मुर्खपणाचे आहे.असा धादांत मुर्खपणा भाजपाची महाराष्ट्रातील पिलावळ करीत आहे.फडणवीसांचे सोनियांना पञ , या मुर्खपणाचा कळस आहे.

खरं तर फडणवीसांनी , मोदीजींच्या समोर जावून त्यांना " हे काय सुरु आहे ,"  असा जाब विचारायला हवा होता.संशोधक टीमच्या इशार्या कडे दुर्लक्ष का केले , असे म्हणायला हवे होते , निवडणूका सहा महिने पुढे का ढकलल्या नाहीत , असा प्रश्न करायला हवा होता.कुंभ नाही झाला तर धर्म बुडणार नाही , हे ठासून सांगायला हवे होते , पण...

हे सर्व न करता , मोदींचे आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने , राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने , या महाराष्ट्र द्रोही पठ्याने सोनियानांच पञ लिहले.याच प्रकाराला म्हणतात , आजार हलगटाला आणि औषध पखालीला.महाराष्ट्र भाजपा कोरोना काळात फक्त राजकारण करीत राहीली.उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न रोज करीत राहीली.पण ना ठाकरे बदनाम झाले ना आघाडी सरकार !  उलट फडणवीसांचा महाराष्ट्र द्रोह पुन्हा उघडा पडला.कोरोनावर मात करण्याची भाषा कोणत्याही भाजपाच्या नेत्यानी केली नाही .उलट मंदिरे उघडा , बाजारे उघडा  असेच म्हणत राहीले.आणि हे सरकार पाडू , आता पाडणार , पुढच्या महिन्यात पाडणार , स्वतः च कोसळणार वगैरे गप्पा मारीत राहीले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या सरकारने फडणवीसांची ही बडबड फाट्यावर मारली.भाजपाच्या काककर्कशीला शुन्य महत्त्व दिले आणि अहोराञ काम करीत राहीले.त्याचा परिणाम आज आपण पहातोय , महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा आलेख खाली आला.तिकडे भाजपाच्या राज्यात प्रेतं पुरायला , जाळायला यंञणा मिळाली नाही.गंगा यमुनेत मृतदेह टाकून द्यावी लागली.ही  वस्तुस्थिती असतांना , फडणवीस साहेब निघाले सोनियांना पञ लिहायला ? चोर ते चोर आणि पुन्हा शिरजोर हेच , यातून दिसते.आजचे हे वास्तववादी रिंगण , तुपाळचाळीला अर्पण !

                                       -- राजू पाटील , औसा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या