आशिव व गुलखेडावाडी गावातील महावितरणशी निगडित समस्या सोडविण्यासाठी आ.आभिमन्यु पवार यांनी घेतली बैठक

 आशिव व गुलखेडावाडी गावातील महावितरणशी निगडित समस्या सोडविण्यासाठी  आ.आभिमन्यु पवार यांनी घेतली बैठक

‌ औसा मुख्तार मणियार









‌औसा  तालुक्यातील आशीव व गुळखेडा वाडी गावातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या महावितरण संदर्भातील अडचणी मार्गी लावण्यासाठी आज शेतकरी बांधव महावितरणचे अधिकारी यांची बैठक घेतली. ओव्हरलोड मुळे वीज पुरवठा खंडित होणे, खराब झालेले ट्रांसफार्मर वेळेवर दुरुस्त करून न मिळणे व काही ठिकाणी कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. शेतकरी आणि अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य दाबाने व ठरलेल्या वेळापत्रकानुसार विद्युत पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या. आशिव सब स्टेशनसाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली असून मंजुरीसाठी प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. आशिव येथील सब स्टेशन चे काम लवकरात लवकर पूर्ण करून वीज पुरवठा संदर्भातील समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांना दिली: गुळखेडावाडी गावातील  महावितरणशी निगडित समस्या सोडवण्यासाठी आज बेलकुंड सब स्टेशनला आ. अभिमन्यू पवार यांनी भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ भारनियमन होते. वारे सुटले की झाडांच्या फांद्या तारांना लागून दोन- दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित होतो बऱ्याच वेळा अधिकारी व कर्मचारी अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत. अशा तक्रारी  शेतकऱ्यांनी मांडल्या, शेतकऱ्यांच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मसलगा खुर्द येथे वादळामुळे विद्युत पोल्स वाकल्याचे कळल्यानंतर तिथेही भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व दुरुस्तीचे काम तातडीने करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गावातील कोरुना स्थितीचा आढावा घेऊन कोरणा होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन अभिमन्यू पवार यांनी ग्रामास्थांना केले.यावेळी माजी आमदार दिनकरराव माने, माजी जि. प.सदस्य विनोद माने ,चेअरमन बाबुराव लोखंडे,भाजप तालुका सरचिटणीस संजय कुलकर्णी, प्रगतीशील शेतकरी पंडीत काकडे,अनिल लोखंडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, उपकार्यकारी अभियंता जाधव,शाखा अभियंता सुर्यवंशी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या