पता नहीं जीं कौनसा नशां करता हैं / दो हजार देकर.. खेती को , बरबाद करता हैं //

 पता नहीं जीं  कौनसा नशां करता हैं /

दो हजार देकर.. खेती को ,  बरबाद करता हैं //

--------- ------ ------- -------- -------------------




भारताच्या पंतप्रधानां विषयी मी कांही बोलावे एवढा ' शाना ' मी नक्की नाही .खरं तरं आख्या ब्रम्हांडात , मोदी साहेबा एवढा ' दिमाखवाला ' नेता सापडूच शकत नाही. उगाच नाही तमाम भक्त , मोदीजींना परमपीता मानतात.मानोत बापडे , पीता मानोत अथवा परमात्मा मानोत , आम्ही माञ त्यांना पंतप्रधानच मानतो.लोक आणि जगातील मिडिया त्यांना खोटारडा , आत्मप्रौढी , हुकूमशाह , सत्तेचा गैरवापर करुन मनमानी करणारा , शेतकरी विरोधी , उद्योगपती धार्जिना , देशाचे धार्मिक ध्रुवीकरण करणारा , वगैरे म्हणतात.आम्ही माञ त्यांना भारताचे एक अपयशी पंतप्रधानच मानतो.मान्य आहे , मान्य आहे , देशातील 90% मिडिया त्यांना युगपुरुष मानते , भाग्यविधाता मानते ,काय नको ते मानते .आम्ही माञ त्यांना लोकांची भावनिक फसवणूक करणारा पंतप्रधानच मानतो.

आता हेच पहा , अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर आपल्या पंतप्रधानांनी , शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये टाकले आणि याचा गाजावाजा इतका केला की , हे पैसे जणू तमाम भाजपाच्या लोकांचे घरदार विकूनच जमवले होते.जनतेचे पैसे जनतेला दिले.पण थाट असा की , बापजादे की दौलत लूटी हो.पण हे पैसे देण्याअगोदरच शेतकऱ्यांना लागणाऱ्या खत आणि डिझेलचे दाम जवळपास 50 टक्याने वाढवले , खतांच्या प्रत्येक पोत्या मागे 500 ते 700 रुपये वाढवले.म्हणजे प्रत्येकाला दिले 2000 आणि घेतले सरासरी 6000 हजार .अशा अफलातून डोकेबाज नेत्याला आम्ही माञ भारताचा लबाड व्यापारी पंतप्रधानच मानतो.भक्तांनी जरुर डँडी मानावे , आमचा आक्षेप नाही .

आता हेही पहा , देशात महामारी आली तर या पंतप्रधानांनी आरोग्य उपाययोजना न करता , देशाला थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितले ,हजारो लोक मेले.महामारीवर लस देशात निघाली तेव्हा आपल्या पंतप्रधानांनी , परदेशाला लस पाठवून देश संकटात टाकला.सहा वर्षात हजारो कोटी शानशौक आणि प्रतिमा संवर्धनावर खर्च केले पण हाँस्पिटल उभारले नाहीत.मंदिर मस्जिदचा गोंधळ घातला पण


पण साधे आँक्सिजन प्लँट उभारले नाहीत.कोरोना लस प्रकरणी तर इतका बडेजावी थाट केला की आँक्सिजन साठी , नेपाळ ,बांगला देश , आणि तत्सम राष्ट्रा पुढे हात जोडून उभे राहावे लागले.गर्वाचे घर खाली झाले.चीन ने भारताची जमिन बळकावली , हे पठ्ठे केवळ भाषणी शड्डू ठोकत राहीले.इतकेच नाही हो , सत्ता मिळवण्यासाठी हे महाशय इतके खाली आले की , पश्मिम बंगाल मध्ये जाऊन "  दीदी...ओ...दीदी " अशी अवमान कारक भाषा वापरुन पंतप्रधान पदाची गरीमा पाण्यात टाकून आले.

हे सुद्धा ऐका की तीन काळे कायदे आणून देशातील संपूर्ण शेती अंबानी आदाणीच्या घश्श्यात घालण्याचा घाट घातला.दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर क्रुरपणे लाठी चार्ज केला .गरज नसलेला एनआरसी / सीएए कायदा आणून देश अस्वस्थ केला .

आता हे सांगायची गरज नाही की , लोकशाहीचा चवथा स्तंभ असणारी भारतीय मिडिया , अपवाद वगळून किलोवर खरेदी केली.मिडियाचे आश्रीत बालकं -बालिका , सरकार सोडून विरोधकांना प्रश्न विचारु लागले.

मनमानीपणे केलेली नोटबंदी , देशाला खाईत लोटणारा जीएसटी , निवडणूक आयोगा सारख्या महत्वाच्या विभागाला दावणीला बांधणे , विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी वाट्टेल ते करणे , हे असले छछोर उद्योग केले .तरीही भक्त त्यांना प्रातःस्मरणिय मानतात.आम्ही माञ त्यांना भारताचा दुर्दैवी पंतप्रधानच मानतो.

स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल ,नेहरु , इंदिराजींनी देशातील खाजगी संस्थाने ,बँका उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले .हे महाशय देशाच्या सर्व संम्पतीचे खाजगीकरण करीत आहेत.अगदी ऐतिहासिक लाल किल्ला सुद्धा .तरीही भक्त त्यांना पप्पा समान मानतात , आम्ही माञ त्यांना राष्ट्रसंम्पती विक्रेता पंतप्रधानच मानतो.

आपण पहात राहा ,मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत एक गरीब आणि धर्मवेडे राष्ट्र म्हणून ओळखले जाईल.विश्व गुरु तर सोडाच , एक आर्थिक दृष्ट्या दुबळे , मानसिक दृष्ट्या  भांबावलेले राष्ट्र , म्हणूनच ओळखले जाईल.भारताने जे सत्तर वर्षात कमावले होते , ते अवघ्या सहा वर्षात गमावले आहे .भारताचे भाग्य काळवंडले आहे .देशाच्या उज्वल भविष्याला आमावस्येच्या हाडळेची दृष्ट लागली आहे.तरीही भक्त त्यांना अवतारी आत्मा मानतात , मानोत बंधू , आम्ही माञ त्यांना गंगेला मैली करणारे दुष्टगंगापूञ पंतप्रधानच मानतो.निवडणूक काळात हेच पंतप्रधान वाराणशीत जाऊन " माँ गंगाने बुलाया है " म्हणायचे ; पण आज परिस्थिती अशी गंगेच्या पाञात हजारो प्रेतं तरंगत आहे.गंगेनं कधीही पाहीलं नव्हतं इतकं वाईट दृश्य पाहाण्याची वेळ गंगेवर आली.

आता शेतकरी तर , 2000 खात्यावर पडल्या नंतर , आणि खताचे वाढलेले भाव पाहून सध्या एकच गाणं गूणगूणत आहेत ...

पता नहीं जीं कोनसा नशां करता है /

दो हजार देकर खेती को..बरबाद करता है //

                                  --- राजू पाटील , औसा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या