सार्वजनिक सत्यनारायण भंडारा समितीकडून एक लाखाची मदत
मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद
आरोग्य सेवांचे होणार बळकटीकरण
लातूर/प्रतिनिधी:लातूर शहरातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी उद्योजक,व्यावसायिक तसेच विविध संस्था-संघटनांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी महानगरपालिकेच्या वतीने केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत लातूरच्या मार्केट यार्डातील सार्वजनिक सत्यनारायण भंडारा समितीच्या वतीने १ लाख रुपयांची मदत कोविड १९ फंडाला करण्यात समितीच्या वतीने रोख स्वरूपात ही मदत सुपूर्द करण्यात आली. सामाजिक बांधिलकीचे भान जपत समितीने ही मदत देऊ केली.
याप्रसंगी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अशोकशेठ लोया, अशोकशेठ अग्रवाल, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे,अजिंक्य सोनवणे, लालूशेठ कचोळ्या, आनंद मालु, सुरेश धानुरे, तुळशीराम गंभीरे, दिनकर बापु मोरे, रमेश सुर्यवंशी, मनपा सदस्य अजय दुडिले, चंद्रकांत पाटील, अमर पवार, संजय पाटील, जितेंद्र दासरे, गुलाब मोहिते, बसवराज चवळे, बालाजी देशमुख, नेताजी जाधव, अरुण सावंत व सार्वजनिक सत्यनारायण भंडारा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रेरणादायी कृती -महापौर गोजमगुंडे
सामाजिक एकोपा वाढीस लावण्यासाठी दरवर्षी सार्वजनिक सत्यनारायण भंडारा समितीच्यावतीने मार्केट यार्डात महाप्रसाद केला जातो.अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. आपण केवळ धार्मिक कार्य न करता सामाजिक भान जपणारे असल्याचे समितीच्या सदस्यांनी या कृतीतून दाखवून दिले आहे. सार्वजनिक सत्यनारायण भंडारा समितीची ही कृती सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.