मराठवाड्याचे सुपुत्र,देशाच्या राजकारणातील अभ्यासू युवा नेते पंचायत समितीचे सदस्य, जि.प.सदस्य,आमदार,खासदार ते युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असा प्रवास त्यांनी अंत्यत कमी काळात करून चार वेळा संसदरत्न मिळवला मराठवाड्याची शान आणि मान उंचावणारे युवा नेते राजीव सातव याचं आज पुण्यातल्या जहांगिर हॉस्पिटल मध्ये निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ कॉंग्रेस पक्षाचे नुकसान झाले नसुन मराठवाड्यासह संपुर्ण महाराष्ट्र राज्याची हानी झाली आहे,राजीवजी आपल्यावर इलाज चालू असताना आपण बरे व्हावे म्हणून आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करत होतो पण हे कामी आले नाही.आपल्या जाण्याने प्रचंड दुःख झाले... आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
औसा के शिष्टमसंडल से मुलाक़ात
#भाऊ.
कालच लवकर बरे व्हा म्हणून लिहिलं होतं अन आज सकाळी तुम्ही हे जग सोडून गेल्याची वाईट बातमी कळली, भाऊ मनाला प्रचंड वेदना होत आहेत,जग सोडून जायचं वय नव्हतं तुमचं आपण लवकरच भेटू म्हणून तुम्ही मला वचन दिलं होतं, माझ्या प्रत्येक मेसेजला न चुकता रिप्लाय दिला आता कोण रिप्लाय देणार?
पंचायत समितीचा सदस्य ते खासदार हा तुमचा प्रवास सोप्पा नव्हता, संघटना बांधणीचे तुमचे कौशल्य फार कमी जणांकडे आहे, आज देशावर अन काँग्रेसवर मोठं संकट आले आहे अशा कठीण प्रसंगी तुमची गरज होती भाऊ,आई माजी मंत्री असून ही थेट आमदार किंवा खासदार न होता तुम्ही मजल दरमजल करत एक एक शिखर गाठलं होतं, केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यावर तुम्हाला गृहमंत्री किंवा ग्रामविकासमंत्री म्हणून पहायचं होतं (अर्थात मी माझ्या ओळखीच्या अनेकांना सांगत असे राजीव भाऊ मुख्यमंत्री होण्यापेक्षा केंद्रात गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा ग्रामविकासमंत्री होणं महत्त्वाचं आहे) तुम्ही धोका दिलात भाऊ तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
हिंगोली सारख्या मागास जिल्ह्यातून येऊन पंचायत समितीचे सदस्य ते खासदार होणे पोरखेळ नव्हे (अर्थात तुम्हाला आईचा राजकीय वारसा होता पण तुमच्या आई रजनीताई 90 च्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणातून बाजूला झाल्या होत्या) तुम्ही सक्रिय राजकारणात 2000 साली आलात अन केवळ स्वतःच्या कामावर तुम्ही यश मिळवले.
2014 ते 2019 या काळात खासदार म्हणून तुम्ही केलेलं कार्य अतुलनीय आहे या काळात भाऊंनी संसदेत जवळपास 1 हजार प्रश्न विचारले व जवळपास 200 चर्चा मध्ये सहभागी होत आपल्या वक्तृत्वाची झलक देशाला दाखवली, लोकसभेचे खासदार म्हणून काम करत असताना भाऊंची लोकसभेत 81% उपस्थिती होती अन पाच वर्षात 4 वेळेस संसदपटू म्हणून गौरविण्यात आले होते, पक्षाची अडचण म्हणून 2019 ची लोकसभा न लढवता तुम्ही गुजरात वर लक्ष केंद्रित केले, 2017 सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत तुम्ही घेतलेले कष्ट उभ्या देशाने पाहिले होते म्हणूनच आपल्याला भेटायचं होतं भाऊ आपल्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.
आपल्याला श्रद्धांजली वाहण्यास मन तयार नाही.
©शिवशंकर बोपचंडे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.