ग्रामपंचायतीना नागरिकांच्या सेवेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन जिल्हा परिषदेने पुरवठा करावेत किंवा ग्रामपंचायतना खरेदी करण्याचे आदेश द्यावेत.
- व्यंकटराव पनाळे यांनी केली जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी.
लातुर : दि. १५ - कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन अत्यंत आवश्यक आहे. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ मशीन सर्व ग्रामपंचायतीना जिल्हा परिषदेने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ मशीन सर्व ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध करून ठेवणे गरजेचे असुन अडचणीच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांना चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. आणि ऑक्सिजनची गरज सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत असलेली दिसतच आहे. अनेक भागात ऑक्सिजनचा तुटवडा सुद्धा पडत असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. रुग्णाना ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटीलेटर बेड न मिळणे यामुळे अनेक रुग्ण तडफडून मृत्युमुखी पडलेले आहेत. असेही व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे. यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत मध्येच उपलब्ध करून दिल्यास जनतेची मोठी गैरसोय दूर होणार असल्याचे पनाळे यांनी म्हटले आहे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे हवेतील ऑक्सिजन विशिष्ट पद्धतीने साठवण्याचे यंत्र आहे. यामध्ये हवेतील नायट्रोजन बाजूला करून ऑक्सिजनची घनता वाढवली जाते. हे विजेवर चालणारे यंत्र असून हवेतून ऑक्सिजन मिळवून देते. या यंत्रासाठी सिलिंडरसारखे पुन्हा ऑक्सिजन भरण्याची गरज नाही. त्यामुळे अडचणीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या मशीन कडे अत्यंत उपयोगी यंत्र म्हणून पाहिले जाते.
त्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतला जिल्हा परिषदेने एक हजार मतदारा मागे एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन पुरवठा कराव्यात किंवा ग्रामपंचायतीला खरेदी करण्याबाबत तसे आदेश द्यावेत. अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लोकाधिकार संघाने केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.