सर्पमित्रांना संरक्षित कीट आणि विमा कवच द्यावे.* - *लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे*

 *सर्पमित्रांना संरक्षित कीट आणि विमा कवच द्यावे.* 


- *लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे* 





लातुर : दि. १० - स्वतःचा जीव धोक्यात घालून जनसामान्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि सापाला मारू नका, असे सांगत सापांना जीवदान देण्यासाठी कुठल्याही वेळेला फोन आला तर धावत जाऊन मदत कार्य करणाऱ्या सर्पमित्रांना त्यांच्या संरक्षणासाठी संरक्षित किट देऊन सर्पमित्रांना किमान १० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे अशी मागणी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

नुकतेच शनिवार दि. ८ मे रोजी शिरूर आनंतपाळ तालुक्यातील दैठणा या गावातील अभिजीत गोरख कासराळे या २२ वर्षीय युवक सर्पमित्राचा येरोळ येथे साप पकडुन डब्यात बंद करून दुर जंगलात सोडण्यासाठी जात असताना इंडियन कोब्रा या जातीच्या सापाने पकडून बंद केलेल्या डब्यातून उसळी मारून अभिजीत च्या पायाला दंश केला. अभिजीतला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अभिजीत चा मृत्यू झाला. आणि अभिजीत च्या आई-वडिलांना त्यांचा मुलगा गमवावा लागला. मयत सर्पमित्र अभिजीत कासराळे यांच्या आई वडीलांना  शासनाने तात्काळ आर्थिक मदत देऊन कासराळे कुटुंबीयांना आधार द्यावा. अशी हि मागणी व्यंकटराव पनाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

 प्राणिमात्राला जीवदान देणाऱ्या अशा सर्पमित्रांना प्रसंगी स्वतःचा प्राण गमवावा लागतो. यासाठी वनविभागाने सर्व सर्पमित्रांना संरक्षित किट देण्याची तात्काळ व्यवस्था केली पाहिजे असे  लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सर्पमित्रांना शासनाने किमान १० लाख रुपयांचे विमा कवच द्यावे. तसेच या सर्व सर्पमित्रांना महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र देऊन त्यांना सन्मानित करावे. अशी मागणी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या