रमजान ईद साठी किराणा व भाजी पाले सामान खरेदी करण्यासाठी सुट द्यावे

रमजान ईद साठी किराणा व भाजी पाले सामान खरेदी करण्यासाठी सुट द्यावे मुज़फ्फर अली ईनामदार




औसा प्रतिनिधी सविस्तर वृत असे आहे की मुस्लिम समाजात दोनच सण महत्वाचे आहेत त्यात रमजान ईद हा सण सर्वात मोठा सण आहे.तसेच कोविड मुळे लॉकडाऊन चालू आहे . व मुस्लिम समाज सातत्याने लॉकडावूनचे काटेकोर पालन करत आहे. त्याकारणाने मुस्लिम समाजाने ईद साठी नवीन कपडे किंवा ईतर नवीन वस्तू खेरीदी केल्या नाहीत . पण किमान ईद साठी लागणारा किराणा सामान व भाजी पाले तरी खेरीदी करून पारंपरिक खाद्य पदार्थ तयार करून ईद साजरी करावी लागेल पण लातूर जिल्हाधिकारी साहेबानी राज्य सरकारच्या पुढे जाऊन अजबच फरमान काढले आहे .ईदच्या समोर कडक लॉकडाऊन 8 मे ते ईद च्या आदल्या दिवसा पर्यंत किंवा 13 तारखेला ईद सुद्धा असू शकते. कड़क लॉकडाउन म्हणजे गोर गरीब मुस्लिम समाज हा रमजान ईद चा राशन देखील खरेदी करू शकणार नाही. जे काही मालदार आहेत ते पूर्वीच खरेदी करून ईद साजरी करण्यासाठी सज्ज आहेत पण कामगार , मजूर लोक काय करणार तेव्हा मा.जिल्हाधिकारी साहेब किराणा, भाजीपाला आणि मांसाहार विक्री ही विकेंड लॉकडाऊन सुद्धा या आठवड्यात  टाळावे व सकाळी ७  ते ११ कोव्हीड नियमांचे पूर्ण पालन करीत चालू ठेवावे ही विनंती आहे.

  याची एक प्रत मा.मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य.

मा.अल्पसंख्याक मंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य.

मा. पालक मंत्री साहेब,लातूरजिल्हा       याना  पाठविल्याची 

*सय्यद मुजफ्फर अली हाशम अली ईनामदार*

 *एमआयएम प्रमुख  औसा यांनी काळविले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या