गुळखेडा सोसायटीतर्फे एक कोटी रुपयाचे ऊस कर्ज वाटप
जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना दिलासा
औसा प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. मुलीच्या लग्नासाठी शुभमंगल योजनेनंतर आता शेतकऱ्यांना ऊसाची लागवड करण्यासाठी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे चेअरमन अॅड श्रीपतराव काकडे कार्यकारी संचालक व संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या मेहनती व गरजू शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायटी च्या माध्यमातून ऊस कर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.गुळखेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन निवृत्ती शिंदे व गटसचिव नूर खुर्शीद पटेल यांनी गुळखेडा येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणता यावी म्हणून 2021 सालासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य कर्ज स्वरूपात येथील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकाऱ्यांनी मिळवून दिले आहे.मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने येलोरी व गुळखेडा तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला तसेच तलावात पाणी असल्याने गावातील विहिरी व विंधन विहिरीतही पाणी उपलब्ध असल्याने ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मांजरा परिवाराच्या कार्यक्षेत्रात हा भाग असल्याने शेतकऱ्यांना साखर कारखान्यास ऊस पाठविण्यासाठी फारशी अडचण येत नाही तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीउटगे यांनी ही ऊस तोडणीचे उत्तम नियोजन केल्याने ऊस उत्पादकांची कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रति एकर 46 हजार रुपये प्रमाणे गरजू शेतकऱ्यांना शेतातील सिंचन व्यवस्था व इतर बाबी तपासून गुळखेडा विविध कार्यकारी सोसायटी च्या माध्यमातून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने 171 शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांचे ऊस कर्ज वितरित केले असून जिल्हा बँकेच्या या सहकार्यामुळे गुळखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त होत आहे
नुर खुर्शीद पटेल
गटसचिव वि.का.सो.गुळखेडा
गुळखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी अंतर्गत 422 सभासदापैकी 413 सभासदांनी मार्च अखेर संस्था स्तरावर 100% वसुली झाली असून या वसुली करिता संचालक मंडळाने मोलाचे सहकार्य केले असून सर्व सभासद वेळेवर कर्ज जमा करून सहाकार्य केल्यामुळे गुळखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची 100% वसुली झाली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.