औसा येथे हणमंत राचट्टे युवामंच च्या वतीने कोविड मयताची अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान..!!*
औसा प्रतिनिधि
*सध्या कोरोनाचा कहर मोठा आहे अनेक रुग्णांचा कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू होत असून एप्रिल महिन्यात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मयताचे आप्तस्वकीय सुद्धा अश्या कोविड रुग्णच्या मृत्यू नंतर लांब जात आहेत लातुर जिल्ह्यातील औसा नगर पालिकेचे दहा कर्मचारी विविध जाती धर्माच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करत आहेत... त्यांना सुद्धा कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका असूनही 'अंत्यविधीचे कार्य' पार पाडत असल्याने औसा शहरातील "हणमंत राचट्टे युवा मंचच्या वतीने" या कर्मचाऱ्यांना २१०००/- रु ची रोख रक्कमेची मदत, सुरक्षेसाठी चांगल्या प्रतीचे मास्क्स, सॅनीटायजर्स वाटप करत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या*.
*यावेळी उपस्थित डॉं सचितानंद रणदिवे, डॉ एजाज शेख, डॉ अभिषेक सानप, विकास नरहरे,विश्वराज औटी, किशोर पारूडकर, निशांत राचट्टे, रोहित कोरके, रणविर बनकर, निखील कुर्ले, हेमंत जाधव,किरण औटी, पत्रकार,युवा मंच चे पदाधिकारी ..... आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नगरपलिकेच्या स्वच्छता विभागच्या दहा कर्मचारी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व अधिपरिचारिका याच्या देखिल सत्कार करण्यात आला आहे.*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.