औसा तालुक्यातील टाका गावात वाढता कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी तहसिलदार,गटविकास अधिकारी आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकारी यांची भेट
औसा प्रतिनिधि
आज टाका गावातील वाढता कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी औसा पंचायत समतीचे गट विकास अधिकारी,तहसीलदार औसा,तालुका आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकारी यांनी टाका गावाला भेट दिली.यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र टाका येथे सर्व आरोग्य कर्मचारी यांचाशी बैठक घेऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गावात अंटी कोरोना फोर्स तयार करुणे,गावातील जि प शाळेत कोरोना पेशंटना आयशोलेशन करणे,तसेच गावातील सर्व दुकाने बंद करणे,गावात संचार बंदी करणे,विना मास्क पिरणे यावर कडक कार्यवाही करावी असे सांगितले व गावात उद्या 04/05/2021 स.11.00 पासुन गावात जनता कर्फु लागु करावे असे सुचविले.तालुक्यावरुन आलेल्या अधिकारी यांच्या सोबत पं स माजी सदस्य संदिपान भैय्या शेळके,उपसरपंच अतुल शिंदे,दत्ता शिंदेसर,सुधाकर लोकरे,जितेंद्र शिंदे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.