आज ३ मे जागतिक वृत्तपत्र स्वतंत्रता दिन




       *आज ३ मे जागतिक वृत्तपत्र स्वतंत्रता दिन* आहे. त्यानिमित्ताने वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी ज्या ज्या पुर्वसुरींनी कष्ट घेतले , बलिदान पत्करले , ज्यांच्या हत्या झाल्या त्यांना अभिवादन करून या दिनाच्या हार्दिक सदिच्छा

           जागतिक वृत्तपत्र स्वतंत्रता दिन दरवर्षी दि. ३ मे रोजी  संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्देशांना अनुसरून साजरा केला जातो. *१९९८ पासून हा दिन साजरा केला जातो*.           

      नामिबीयातील विंडहोक येथे अफ्रिका खंडातील पत्रकारांची दि.२८ एप्रिल ते ३ मे १९९१ या कालखंडात परिषद झाली होती. त्यामध्ये वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा जाहिरनामा प्रसिद्ध केला.  माध्यमांचे स्वातंत्र्य , विविधता आणि बाह्य हसतक्षेपापासुन मुक्तता ही तत्वे त्यात केंद्रस्थानी होती. १९९८ पासून दरवर्षी मध्यवर्ती सुत्र ठरवून त्यावर विचारमंथन होत असते. 

     *गेल्या वर्षभरापासून COVID - 19 च्या प्रसारामुळे मुद्रित तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांना नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या माध्यमांची गरज असताना तीच टिकतील की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. मग वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुद्दा तर लांबच राहिला*. 

     " रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर " या संस्थेने  *१८० देशांच्या ' जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ ' प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये जी क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यात भारताचा क्रमांक १४० वा आहे. यंदा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक २०२० प्रकाशित झाला आहे. त्यात भारत १४२ नंबर वर गेला आहे.*.    

*India is one of the World's most dangerous countries for journalists trying to do their job properly*. 

*Modi tightens his grip on the media*.

        जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश आणि आपली अशी स्थिती. जगातील पत्रकार भीतीच्या सावटाखाली आहेत आणि त्यांच्या संदर्भातील हिंसा वाढतंच आहे. भांडवलदारांच्या आणि राज्यकर्त्यांच्या अंकित असणाऱ्या मिडिया हाऊसेस व त्यांच्या लाचारांबद्दल हे नाही हे समजून घ्यावे. 

  " Journalism Without Fear or Favour " यावर सुध्दा नंतर सविस्तरपणे चर्चा होवू शकते. *पुन्हा एकदा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनी परखड स्वचिंतन करण्यासाठी बळ मिळो याच सदिच्छा*. 

- *विजय मांडके* , 

*पत्रकार* , 

*सातारा* 

*९८२२६५३५५८*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या