सुधीर खिरडकर सारख्या लाचखोर आणी जातीयवादी आधिका-यामुळे पोलिस प्रशासनाची बदनामी- उत्तरेश्वर कांबळे
लातुर प्रतिनिधी:लक्ष्मण कांबळे
जालना येथील उपविभागीय पोलीस आधिकारी सुधीर खिरडकर याच्यासह 2 पोलिस कर्मचा-यांना अॅट्रासिटी प्रकरणात 3 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
दरम्यान सुधीर खिरडकर हा लाचखोर व जातीयवादी आणी दलित विरोधी पोलीस आधिकारी असुन त्याच्यामुळे महाराष्ट्रातील पोलिस प्रशासन बदनाम होतं आहे. अशी प्रतिक्रिया भीम आर्मी महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रतिनिधींना बोलताना दिली आहे.
पुढे बोलताना म्हणाले की अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायला असे जातीव्देषी पोलिस आधिकारी सातत्याने टाळाटाळ करतात. आरोपींना पाठीशी घालून त्याला अटक न करता आर्थिक तडजोड करून जामिन मिळवून देतात. अॅट्रासिटी प्रकरणात योग्य तो तपास करतं नाहीत. फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतं नाहीत. अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायदा ( अॅट्रासिटी) च्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतं नाहीत. त्यामुळे
खिरडकर सारख्या लोकांची दलित समाजाला बद्दल असलेली जातीयवादी मानसिकता यातून स्पष्ट दिसत आहे.
असलेच लोक पोलीस प्रशासनाला कलंक आहेत. त्यामुळे सुधीर खिरडकरला सेवेतून बडतर्फ करण्यात आले पाहिजे असे. उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.