मराठवाडा वॉटर ग्रीडचे चुकीचे श्रेय घेउ नये
शिवाजीराव पाटील कव्हेकर
शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.24/5/2021
मराठवाडयाच्या पाण्याची भिषण परिस्थीती लक्षात घेउन देवेंद्र फडणवीस सरकारणे मराठवाडयातील 11 धरणे जोडून शेती, उद्योग व पिण्यासाठी पाणी देण्याची क्रांतीकारी योजना इस्त्राईलच्या मेकरोट कंपणीने एक वर्षे अभ्यास करून तयार केली व या योजनेस विधीमंडळ व कॅबिनेट मंत्रीमंडळाणे मान्यता त्याच वेळस दिली या योजनेस जपाण बँकेने कर्ज देण्याचे मान्य केले होते. या योजनेचा पहिला भाग म्हणून लातूर उस्मानाबाद, बिड, जालना, औरंगाबाद, येथील टेंन्डर जागतीक स्थरावर काढण्यात आले होते. या पहिल्या टप्यासाठी 10595 कोटीच्या अपेक्षीत खर्चाला देवेंद्र फडणवीस सरकारणे व पाणी पुरवठा खात्याचे मंत्री आमदार बबनराव लोणीकर, यांनी मान्यता दिली होती. असी व्यापक व 2030 पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेउन ही योजना मंजूर करण्यात आली होती. निवडणूकी नंतर विश्वास घातामुळे भाजपा सरकार, सत्तेत पुन्हा आले नाही. व नविन आलेल्या सरकारने आलेले टेंन्डर आत्तापर्यंत ओपन केले नाही, बजेट मध्ये आर्थीक तरतूद केली नाही. असे असताना वॉटर ग्रीड योजना पहिल्या टप्याला या शासनाने मान्यता दिली हे सांगणे जनतेची दिशाभुल करून खोटे श्रेय घेणे आहे अशि प्रतिक्रीया भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली.
ही योजना जायकवाडी व उजणी धरणास मराठवाडयाचे 11 धरणे जोडले जाउन व त्यातून 18 अब्ज टी.एम.सी.पाणी देणार जायकवाडी धरणातून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड हि जिल्ले व उजणी धरणातून उस्मानाबाद, लातूर , बिड, पाणी मिळणार आहे. ही योजना कार्यान्वीत करण्यासाठी ना.बबनराव लोणीकर, हे इस्त्राईल, ऑस्ट्रेलीया व कॅनडा देशातील तंत्रज्ञानाबरोबर घेउन भेट देउन योजनेचा आभ्यास आनेक दिवस केल्याचे लोणीकर साहेब यांनी स्वतः फोनवर बोलल्याचे कव्हेकर साहेब यांनी सांगीतले. ही योजना दूर दृष्टीने आत्मविश्वासाने व कष्टाने राबविण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणविस सरकारणे केला होता. आनेक वर्षे महाराष्ट्राचे प्रमुख सत्ताधारी म्हणून राहूनही लातूरच्या जनतेला आजही 10 दिवसाला पाणी मिळते लातूर च्या पाण्याची मुख्य पाणी पुरवठा योजना मांजरा धरणातून आनन्याचे काम आम्ही आमदार असताना सन 1997 साली झाले आहे. परंतु शहरातील पाईपलाईन अद्याप पूर्ण होउ शकली नाही. त्यामुळे धरणात पाणी परंतू लातूरात पाणी नाही अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या सरकारणे करून ठेवलेली मराठवाडयाच्या अत्यंत हिताची वॉटर ग्रीड योजना न थांबवता आघाडी सरकारणे आर्थीक तरतुद करून ती राबवावी असे अवाहन शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
-
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.