सूर्योदया फाउंडेशनच्यावतीने मोफत भोजन

 


सूर्योदया फाउंडेशनच्यावतीने मोफत भोजन















लातूर, दि.२४- कोरोनामुळे ग्रामीण रुग्णांना उपचारासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. लॉकडाउनमुळे सर्व खानावळ, हॉटेल, दुकाने बंद आहेत. रुग्ण व नातेवाईकांना जेवणासाठी अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे पुणे येथील सूर्योदया सायन्स फाउंडेशनच्यावतीने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफतम जेवण देण्यात येत आहे.
सुर्योदया सायन्स फाउंडेशन, पुणे व सोन्ने इंटरनॅशनल, ऑट्रिया यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्ण व नातेवाईकांना दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. मागील २० दिवसांपासून स्वयंसेवक ऍड. नीलेश मुचाटे व नितीन राजोळे हे रुग्णाना भोजन वाटप करीत आहेत. गरजवंत असलेल्या ४८० रुग्णांना जेवण देण्यात आले. हा उपक्रम गरजवंतांसाठी सुरूच आहे. यासाठी सूर्योदया फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र ढेले, उपक्रम प्रमुख डॉ. निरामय लामदाडे, ऍड. नीलेश मुचाटे व नितीन राजोळे हे प्रयत्न करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या