शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा - ऑनलाईन व्हर्च्युअल औद्योगिक कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद
लातूर : सोमवार दि. २४ मे रोजी शासकीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा आणि पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने लाइव वेबिनार च्या माध्यमातून संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रम (Industrial Workshop) आयोजित करण्यात आले. जगभरात वाढत्या शहरीकरणासोबत वाढणाऱ्या ऊर्जेचे अचूक नियोजन करण्यासाठी जिल्हा किंवा स्थानिक पातळीवर ऊर्जा नियोजन करणारी डी.ई.एस. प्रणाली गरजेची आहे असे प्रतिपादन केदार खमितकर यांनी केले. यावेळी प्राचार्य एन.डी.पिंडकुरवार, अभियंता नितीन घोडके - मुंबई, शासकीय औ.प्र.संस्था चे इन्स्ट्रक्टर बी.पी. सोनटक्के, पीसीआरए चे उप-प्रादेशिक अधिकारी श्रीमती स्वाती कुमारी पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतातल्या वेगाने वाढणाऱ्या शहरांमधले ढोबळ घरगुती उत्पन्नही वाढते असायला हवे आणि त्यासाठी ऊर्जेचा अखंड पुरवठा करणे महत्वाचे असणार आहे. जगभराचा विचार केला तर ऊर्जेच्या एकूण जागतिक वापरापैकी ७० टक्के ऊर्जा ही शहरांमध्ये वापरली जाते. त्याचवेळी हरितवायुंच्या जगभरातल्या एकूण उत्सर्जनापैकी (ग्रीन गॅस एमिशन) ४० ते ५० टक्के उत्सर्जन शहरांमधूनच होत असते. वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण झालेली ही समस्या सगळ्याच देशांसमोरचं एक मोठे आव्हान असल्याचे खमितकर म्हणाले.कार्यक्रमाचा समारोप सक्षम प्रतिज्ञेने करण्यात आला.ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण आणि कोऑर्डिनेशन अभियंता किरण खमितकर यांनी वरदानी भवन लातूर येथून यशस्वीपणे केले. औ.प्र. संस्थेचे १५० विद्यार्थी विद्यार्थीनी ऑनलाइन वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा प्रशिक्षण घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.