पेट्रोल डिझेल गॅस व जिवनावश्यक वस्तुची दरवाढ कमी करा.... राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची मागणी

 पेट्रोल डिझेल गॅस व जिवनावश्यक वस्तुची दरवाढ कमी करा.... राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी औसा 





औसा मुख्तार मणियार

सध्या देशामध्ये कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच या महामारीमुळे सततच्याा लाॅकडाऊनमुळे सामान्य नागरिक होरपळून निघाला आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅस जीवनावश्यक वस्तूची दरवाढ कमी करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस औसा शहरच्या वतीने  दि. 24 मे 2021 सोमवार रोजी करण्यात आली असून त्या आशयाचे निवेदन तहसीलदार औसा यांच्या मार्फत मा.पंतप्रधान यांना पाठवण्यात आले आहे.

कृषिप्रधान देशात केंद्र सरकारने मागील पंधरवड्यापासून पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ केली असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतकरी मोडकळीस आलेला आहे. सदर दरवाढ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेलचे दर भरमसाठ वाढले आहे. तरी केंद्र शासनाने पेट्रोल ,डिझेल घरगुती गॅस ची भाव कमी करून जनतेला दिलासा द्यावा असे निवेदन देण्यात आले.या निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष  संगमेश्वर उटगे, तालुकाध्यक्ष शीवाजी सावंत ,भरत सुर्यवंशी,गोंवीद जाधव, निशांत वाघमारे, अविनाश टिके,कृष्णा सावळकर, गणेश साळूंके,सिद्दीकी फरहान, पवार पवन आदिच्या स्वाक्ष-या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या