कोरोनाला हरवण्यासाठी जि. प प्रशाला तावशी येथील शिक्षक यांनी एक महिण्याचे वेतन दिले मुख्यमंत्री सहायता निधीला

 कोरोनाला हरवण्यासाठी जि. प प्रशाला तावशी येथील शिक्षक यांनी एक महिण्याचे वेतन दिले मुख्यमंत्री सहायता निधीला 

औसा प्रतिनिधी

 विलास तपासे









शिक्षक 

समाजाचा हा शिल्पकार सतत समाजाचं भवितव्य ऊर्जावान बनवण्याच्या कामी गुंतलेला असतो आणि याच गुंतलेल्या हातांनी या राष्ट्र निर्माण करत्याने   कोरोनाच्या वैश्विक संकटात आपला यशस्वी सहभाग नोंदवत या महामारीला नियंत्रणात करण्यात शासनाला मदत केली आपत कालीन परिस्थितीत कर्तव्याचा भाग मानून इतर सर्व अशैक्षणिक कामांसोबत कोरोना ड्युटी ही त्यांनी विनाकारण स्वीकारली एप्रिल २०२० पासूनच या साथीचा सामना करताना आरोग्य यंत्रणेला ताण येवू लागला मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवा कोरोना लढ्याकरिता अधिग्रहित करण्यात आल्या. बालवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका व आशा वर्कस यांच्यासोबत प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षकांची या कामी नेमणूक करण्यात आली या आधी आलेल्या प्रत्येक राष्ट्रीय कार्याला शिक्षकांनी पूर्ण निष्ठेने सहकार्य केले पण आता मात्र थेट जीवाशी खेळ होता काम करायला शिक्षकांचा कधीच नकार नव्हता पण यावेळी जी कामे दिली गेली त्याचं किमाण प्रशिक्षण आणि पुरेसे स्वरक्षण  तरी त्यांना दिल गेले होते का अपुऱ्या स्वरक्षणात  कोणत्याही प्रशिक्षणा शिवाय आदेश मिळताच शिक्षक कोरोना कर्तव्यावर हजर झाले आणि नाकाबंदी साठी गठित पथकातले शिक्षक  बारा बारा तास रस्त्यावर उभे राहू लागले शाळेमधील विलगीकरण कक्षाचे व्यवस्थापन करताना प्रत्यक्ष कोरोना बाधित रूग्णात  वावरून स्वस्त धान्य दुकानात पालकाधिकारी म्हणून काम करताना शिक्षक हरकाम्य झाले, स्क्रीनसोबत घरोघरी जाऊन नागरिकांचा सर्वेक्षण करताना शिक्षक याचक बनले, आरोग्य केंद्रात माहितीचं संकलन करताना शिक्षक कारकुन झाले, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा ट्रेकिंग करताना शिक्षक पोलीस झाले, सोशल मीडियावर जनजागृती करताना शिक्षक मोटिव्हेशन स्पिकर झाले, दारुच्या दुकानांसमोर रांगा लावतान शिक्षक स्वयंसेवक झाले, आपत्ती व्यवस्थापन कक्षात काम करताना शिक्षक डिजास्टर मॅनेजर झाले. घरोघरी किराना माल पोहचवताना शिक्षक डिलेव्हरी बाॅय झाले. या सारख्या कामांसोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग घेवून त्यांचा अभ्यासक्रम हि पुर्ण केला शाळेत न जाता शाळेची सर्व जबाबदारी पुर्ण केली शिक्षकांनी शिकवणे या त्यांच्या जॉब चार्ट च्या पलिकडे जावूनहि जबाबदारी पारपाडली.

कोव्हिड १९ आपत्ती निवारणाकरिता तावशी ताड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षण आप्पासाहेब शेषेराव पांचाळ यांनी आपले एक महिण्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळविले आहे मातोळा येथील मुळचा रहिवासी आप्पासाहेब पांचाळ गेल्या २२ वर्षापासून शिक्षक असून सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी मे २०२१ चे पुर्ण वेतन देण्याचा निर्णय घेतला २० मे रोजी त्यांनी जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी.पी व शिक्षणाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे कार्यलयातील

 यांनी मे २०२१ वेतनातून पुर्ण एक महिण्याचे वेतन साहायता निधीसाठी कपात करुन घेण्याची विनंती केली आहे. पांचाळ यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या