अक्का फाऊंडेशनच्या लसीकरण टास्क फोर्सचा सेवा संकल्प मेळावा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन
लातूर/ प्रतिनिधी: लसीकरणाबाबत जनजागृती व उपाययोजना करण्यासाठी अक्का फाउंडेशनच्या वतीने लसीकरण टास्क फोर्स गठीत करण्यात आले आहे.या फोर्स मध्ये सहभागी तरुणांचा सेवा संकल्प मेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३ टक्के नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.९७ टक्के नागरिक अद्यापही लसीकरणापासून वंचित आहेत.सध्या लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे.अनेक ठिकाणी लस मिळत नाही.लस असेल तर गर्दी होत. लस नेमकी केंव्हा मिळणार याची माहिती मिळत नाही.या व अशाच अडचणी दूर करण्यासाठी अक्का फाउंडेशनच्यावतीने लसीकरण टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ७०० तरुण यात सहभागी झाले आहेत.
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या पातळीवर टास्क फोर्सचे स्वयंसेवक नागरिकांना मदत करणार आहेत.लसीकरण सुरू असणाऱ्या १०० पेक्षा अधिक केंद्रांवर हे स्वयंसेवक नोंदणी करणे,पाणी व गरज पडल्यास ग्लुकोज सारख्या औषधांचा पुरवाठा करणार आहेत.१०० टक्के लसीकरण होईपर्यंत सेवा देण्याचा संकल्प या स्वयंसेवकांनी केला आहे.जिल्हा प्रशासन व नागरिकांना जोडणारा दुवा म्हणून अक्का फाऊंडेशन काम करत असल्याची माहिती युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली.
अक्का फाउंडेशनच्या वतीने आयोजित या उपक्रमातील टास्क फोर्समधील स्वयंसेवकांचा सेवा संकल्प मेळावा मंगळवार दि.२५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.झूम वेबिनारच्या माध्यमातून सायंकाळी ६ वाजता हा मेळावा होणार आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या वेबिनारला मार्गदर्शन करणार आहेत. लसीकरण टास्क फोर्स मधील सर्व स्वयंसेवकांनी यात सहभागी व्हावे.कोरोना विरुद्धच्या लढाईतील शेवटचा टप्पा असणाऱ्या लसीकरणाच्या कार्यात स्वतःला सहभागी करून घ्यावे,असे आवाहन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.