जिल्ह्यातील कोविड संरक्षण खबरदारी,जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम ऑन-लाईन प्रणालीद्वारे संपन्न :-*
औसा प्रतिनिधि
आज दिनांक 23 मे 2021 या रोजी स्वंय शिक्षण प्रयोग ,लातूर व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑन-लाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले . प्रशिक्षणासाठी *कोविड प्रसार होण्याची कारणे आणि त्यावरील कोविड संरक्षण उपाय* या विषयावरील चर्चासत्र आयोजित करून तज्ञ,अनुभवी यांकडून मार्गदर्शन करण्यात आले, यात जि.प. लातूर चे आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.परगे सर , डॉ.हिंदोळे सर, डॉ.नागपुरे सर यांचे विशेष अनुभव,कॉविडं प्रसाराची कारणे, त्यावरील उपाय या विषयावर सर्व जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपात गावातील व्यक्तीचे प्रश्नोत्तरे घेण्यात आली, सदरील कार्यक्रमास लातूर जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ..यावेळी स्वंय शिक्षण प्रयोग लातूर या संस्थेच्या सामाजिक कामावरील आरोग्य विभागातील मदत व सामाजिक जनजागृती कार्यक्रम यामधील योगदान , कार्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कौतुक केले.
सदरील कार्यक्रम हा कोविड जनजागृतीची गरज लक्ष्यात जिल्ह्यतील सर्व आणि कॉविडं ऍक्टिव्ह अकॅशन कमिटी मधील सर्व अनुभव लोकांनी खबरदारीवरील उपाय , समाजातील गैरसमज ,शंका त्यावरील उपाय या प्रश्नासोबतच सखोल चर्चा करून त्यांचे निरासरण केले गेले , प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.दिलीप धवन-(प्रकल्प समन्वयक) यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता अजित धनुरे ,अंजली मसलकर,सुमित्रा जाधव, मंगलताई वाघमारे ,संगीता हांनकुडे तसेच श्री.दिलीप कुंडगिर ,श्री. कन्हैया पवार (सर्व तालुका समन्वयक ) यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.